Dawood Ibrahim hospitalised in Karachi: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीच्या रुग्णालयात दाखल
त्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला गंभीर अवस्थेत कराचीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या घटनेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
Dawood Ibrahim hospitalised in Karachi: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) ला पाकिस्तानातील कराची (Karachi) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊदला कराची (Karachi) मध्ये एका अनोळखी व्यक्तीने विष दिले. त्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला गंभीर अवस्थेत कराचीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या घटनेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दाऊद दोन दिवसांपासून रुग्णालयात दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
याआधीही दाऊदला अनेक गंभीर आजार झाल्याचा दावा करण्यात आला होता. असे सांगण्यात येत आहे की, दाऊदला हॉस्पिटलमध्ये कडक सुरक्षेत ठेवण्यात आले असून त्याच्या मजल्यावर तो एकटाच पेशंट आहे. केवळ रुग्णालयातील अधिकारी आणि त्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांना मजल्यापर्यंत प्रवेश आहे. (हेही वाचा - Dawood Ibrahim, Hafiz Saeed यांना भारताकडे सुपूर्त करणार का? पाकिस्तानच्या FIA Chief Mohsin Butt ची पहा प्रतिक्रिया काय? (Video))
अंडरवर्ल्ड डॉन रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मुंबई पोलीस त्याच्या नातेवाईक अलिशा पारकर आणि साजिद वागळे यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जानेवारीमध्ये दाऊदची बहीण हसीना पारकरच्या मुलाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला सांगितले होते की, अंडरवर्ल्ड डॉन दुसरे लग्न केल्यानंतर कराचीमध्ये राहतो.