Ukrainian President Zelenskyy यांनी केली PM Modi यांच्याशी फोनवर चर्चा; 'Peace Formula' लागू करण्यासाठी मागितली मदत

व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी ट्विट केले की, "संयुक्त राष्ट्रांमध्ये मानवतावादी मदत आणि समर्थनासाठी मी त्यांचे आभार मानतो."

PM Narendra Modi आणि Volodymyr Zelenskyy (संग्रहित संपादित प्रतिमा)

Ukrainian President Zelensky: सोमवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) आणि पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी फोनवर चर्चा केली. या संदर्भात युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विट केले की, "मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर बोललो आणि त्यांना G20 च्या यशस्वी अध्यक्षपदासाठी शुभेच्छा दिल्या. या व्यासपीठावर मी Peace Formula ला जाहीर केला होता आणि आता मी त्याची अंमलबजावणी करण्यास तयार आहे. मी भारताच्या सहभागावर विश्वास ठेवतो."

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी संयुक्त राष्ट्रात मानवतावादी मदत आणि समर्थनासाठी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी ट्विट केले की, "संयुक्त राष्ट्रांमध्ये मानवतावादी मदत आणि समर्थनासाठी मी त्यांचे आभार मानतो." या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात फोनवर चर्चा झाली होती. (हेही वाचा - पाकिस्तानचा अमेरीका विरोधात घातपाताचा कट? सुरक्षेच्या कारणास्तव अमेरीका सरकारकडून अलर्ट जारी)

त्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, युक्रेनमधील युद्धावर कोणताही लष्करी उपाय असू शकत नाही आणि भारत कोणत्याही शांतता प्रयत्नांमध्ये योगदान देण्यास तयार आहे. झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणादरम्यान, पंतप्रधान मोदींनी शत्रुत्वाचा तात्काळ अंत करण्याच्या, मुत्सद्दीपणा आणि संवादाच्या मार्गावर परत येण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला.

मोदी-झेलेन्स्की चर्चेबाबत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, नेत्यांनी युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर चर्चा केली. शत्रुत्व लवकरच संपुष्टात आणून संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग पुढे नेण्याबाबत पंतप्रधानांनी चर्चा केली.

यापूर्वी, 16 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा केली होती. यादरम्यान, युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या संदर्भात, पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी झालेल्या संभाषणात संवाद मुत्सद्देगिरीद्वारे प्रकरण पुढे नेण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना भारताच्या G-20 च्या सध्याच्या अध्यक्षपदाची माहिती दिली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif