Minister Arrested For Taking Bribe: लाचखोरी प्रकरणात मंत्र्यास अटक; वोलोडिमिर झेलेन्स्की यांची साफसफाई मोहीम

जगभरातील विविध देशांमध्येही असे नमुने आढळतात. एका युक्रेनियन उर्जा मंत्र्यालाही अशाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. युक्रेनच्या एसबीयू सिक्युरिटी सर्व्हिसने (SBU Security Service) दिलेल्या माहितीनुसार, या मंत्री महोदयांनी तब्बल 10 लाख रुपयांची लाच घेतली आहे.

Bribe | (File Image)

भ्रष्टाचार (Corruption) प्रकरणात मंत्र्यांना तुरुंगात जावे लागण्याच्या घटना केवळ भारतातच घडतात असे नाही. जगभरातील विविध देशांमध्येही असे नमुने आढळतात. एका युक्रेनियन उर्जा मंत्र्यालाही अशाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. युक्रेनच्या एसबीयू सिक्युरिटी सर्व्हिसने (SBU Security Service) दिलेल्या माहितीनुसार, या मंत्री महोदयांनी तब्बल 10 लाख रुपयांची लाच घेतली आहे. या मंत्र्यावर डोनेस्तक (Donetsk) प्रदेशातील फ्रंटलाइन खाणींमधून पश्चिम युक्रेनमधील कोळसा खोऱ्यात उपकरणे हस्तांतरित करण्यासाठी खाण अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळल्याचा आरोप आहे.

कोळसा कंपनीशी संबंधित प्रकरण

एसबीयूने सांगितले की, या खाणींमध्ये समाविष्ट असलेली उपकरणे दुर्मिळ आणि महत्त्वाची आहेत. ती डोनेस्तकच्या पोकरोव्स्क भागात मोठ्या प्रमाणात विवादित असलेल्या सरकारी मालकीच्या कोळसा कंपनीशी संबंधित आहेत. 2024 च्या वसंत ऋतूमध्ये, खाण उद्योगाच्या प्रतिनिधींनी पश्चिम युक्रेनमध्ये वापरण्यासाठी उपकरणे युद्ध क्षेत्राबाहेर हलविण्याची परवानगी मिळवण्यासाठी उप ऊर्जा मंत्र्यांशी संपर्क साधला. अशा मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असतानाही, मंत्र्याने हस्तांतरण अधिकृत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाच मागितल्याचा आरोप आहे.

आरोपीचे नाव विरोधकांमुळे उघड

SBU ने अहवाल दिला की, सदर मंत्र्यांनी तीन कथित साथीदारांच्या मदतीने लाच स्वरुपातील पहिला हप्ता घेतला. मात्र, त्यानंतरचा हप्ता मिळविण्यासाठी पैसे स्वीकारत असताना ते रंगेहात पकडले गेले. एसबीयूने सुरुवातीला आरोपींची ओळख उघड केली नसली तरी अटकेचे फोटो संशयितांचे चेहरे अस्पष्ट स्वरुपाच प्रसिद्ध करण्यात आले. नंतर युक्रेनचे विरोधी पक्षाचे खासदार यारोस्लाव झेलेझन्याक यांनी यातील अस्पष्ट चेहरा ओळखला असल्याचा दावा केला. त्यांनी हा चेहरा मंत्री ओलेक्झांडर खेलो यांचा असल्याचे म्हटले. युक्रेनचे उप ऊर्जा मंत्री आहेत. युक्रेनच्या मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळाने सरकारी टेलिग्राम चॅनेलवर जाहीर केल्याप्रमाणे खेइलो यांना त्यांच्या अटकेनंतर पदावरून बडतर्फ करण्याचा आदेश जारी केला.

भ्रष्टाचाराशी दीर्घकाळ संघर्ष करणाऱ्या युक्रेनने भ्रष्टाचारविरोधी प्रयत्न तीव्र केले आहेत. विशेषत: ते युरोपियन युनियनचे सदस्यत्व आणि पाश्चात्य लष्करी सहयोगी देशांकडून सतत पाठिंबा शोधत आहेत. भ्रष्टाचार संपवण्याच्या व्यासपीठावर प्रचार करणारे युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी यापूर्वीच्या भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यांमध्ये संरक्षणमंत्र्यांसह अनेक अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे.

युक्रेन सध्या अभूतपूर्व अशा परिस्थितीतून जात आहे. एका बाजूला रशियासोबत सुरु असलेला युद्ध संघर्ष. दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय पातळीवर रशियाविरोधात पाठिंबा मिळवणे. त्यासाठी नाटो गटाकडून सहकार्य मिळविणे. त्याच वेळी रशियाकडून होत असलेल्या भेदक शस्त्रास्त्र माऱ्यांचा सामना करणे, असा एक ना अनेक आव्हानांना हा देश तोंड देतो आहे. अशा वेळी या देशास भ्रष्टाचारासोबतही युद्ध करावे लागत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif