Partygate Scandal: UK PM Boris Johnson यांना दिलासा; अविश्वास ठराव जिंकल्याने पंतप्रधान पद अबाधित
बोरिस जॉन्सन आणि त्यांची पत्नी कॅरी यांनी जून 2020 मध्ये डाऊनिंग स्ट्रीटच्या कॅबिनेट रुममध्ये लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन करुन वाढदिवसाची पार्टी केल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला होता.
पार्टिगेट घोटाळ्यामुळे (Partygate Scandal) अडचणीमध्ये आलेल्या बोरिस जॉन्सन (UK PM Boris Johnson) यांना दिलासा मिळाला आहे. त्यांनी 211 विरुद्ध 148 मतांनी अविश्वास ठराव जिंकला आहे त्यामुळे त्यांचे युकेमधील पंतप्रधान पद कायम राहिले आहे. कोरोना संकटामुळे लॉकडाऊनच्या काळात निर्बंध घातलेले असताना बोरिस जॉन्सन यांनी आपल्या कर्मचार्यांसोबत 10 डाऊनिंग स्ट्रिट मध्ये पार्टी केली होती त्यावरून त्यांच्यावर टीका झालेली आणि यामधून त्यांच्याच पक्षातील 40 खासदारांनी बोरिस जॉन्सनच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
Conservative Party च्या बोरिस जॉन्सन यांच्यावर पार्टीगेट प्रकरणासोबतच वाढत्या महागाई वरून देखील दबाव होता. त्यांच्याच पक्षाचे खासदार त्यांच्याविरूद्ध उभे ठाकले होते. बोरिस जॉन्सन आणि त्यांची पत्नी कॅरी यांनी जून 2020 मध्ये डाऊनिंग स्ट्रीटच्या कॅबिनेट रुममध्ये लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन करुन वाढदिवसाची पार्टी केल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला होता. Carrie Johnson ही त्यांची तिसरी पत्नी आहे. 2021 मध्ये ते विवाहबद्ध झाले होते. बोरिस जॉन्सन होते भारताचे जावई; जाणून घ्या नातं कस?
पहा ट्वीट
आता Conservative Party च्या नियमानुसार त्यांनी आता अविश्वास ठराव जिंकल्यामुळे किमान पुढील 12 महिने त्यांना अविश्वास ठरावाला सामोरे जावं लागणार नाही त्यामुळे हा त्यांच्यासाठी मोठा दिलासा आहे.