Rishi Sunak: वाहतुकीचे नियम पाळले नाही म्हणुन थेट ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मागावी लागली माफी

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी उत्तर-पश्चिम इंग्लंडमधील गंतव्यस्थानावर गाडी चालवत असताना सोशल मीडिया व्हिडिओ चित्रित करण्यासाठी सीट बेल्ट काढल्या बाबत माफी मागितली आहे.

वाहतुक आणि वाहतुकीचे नियम हे प्रत्येक नागरिकांसाठी सारखे असल्याचा एक उदाहरण ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी जनतेला दाखवलं आहे. किंबहुना तो अक सर्वसामान्य नागरिक असो वा कुठलाही बडा व्यक्ती पण प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळणे अनिवार्य आहे. वाहतुकीचा नियम पाळला नाही म्हणुन थेट ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी स्वतचा माफीनामा जाहीर केला आहे. काल ऋषी सुनक यांनी स्वतचा एक व्हिडीओ शेअर केला ज्यात ते चालत्या कारमध्ये बसुन बोलत होते पण या कारमध्ये बसले असताना सुनक हे कारच्या मागच्या सिटवर बसुन व्हिडीओ शेअर केला आहे. तरी दरम्यान खुद्द ब्रिटनचे पंतप्रधान असलेल्या ऋषी सुनक यांनी सिटबेल्ट न लावल्याने त्यांना मोठ्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. कारण बॅक सिटवर बसलं तरी वाहतुकीच्या नियमानुसार आणि सुरक्षेच्या दृष्टीने सिटबेल्ट लावणं बंधनकारक आहे आणि एका बड्या देशाचे पंतप्रधान खुद्द सिटबेल्ट लावत नसतील तर ही मोठी धक्कादायक बाब आहे. म्हणून सुनक यांचा तो व्हिडीओ मोठा चर्चेचा विषय ठरला.

 

तरी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी उत्तर-पश्चिम इंग्लंडमधील गंतव्यस्थानावर गाडी चालवत असताना सोशल मीडिया व्हिडिओ चित्रित करण्यासाठी सीट बेल्ट काढल्या बाबत माफी मागितली आहे. सुनकच्या डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्याने सांगितले की सुनक यांनी केवळ व्हिडीओ शुट करण्यासाठी फक्त वेळेकरीता सीट बेल्ट काढला होता आणि तरी त्यांनी त्यांची ही चूक मान्य करत स्वतचा माफीनामा जाहीर केला आहे. (हे ही वाचा:- Global Recession: बहुतेक अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केली 2023 मध्ये जागतिक मंदीची शक्यता; युरोपमध्ये चलनवाढीचा दर 57% पर्यंत पोहोचू शकतो)

 

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात ते सिटबेल्ट न लावता कारच्या मागच्या सिटवर बसलेले दिसत आहेत. पण ब्रिटीश कायद्यानुसार वाहन चालवताना सीटबेल्ट न घातल्याबद्दल ड्रायव्हर आणि प्रवाशांना 500 पौंड पर्यंत दंड होऊ शकतो असा नियम आहे. पण वाहतुक कायद्याचा हा महत्वपूर्ण नियम खुद्द ब्रिटनचे पंतप्रधानचं पाळणार नाही तर सामान्य जनतेने काय करावं असं म्हणत ऋषी सुनक यांच्यावर विरोधकांकडून ताशेरे ओढण्यात आले.