US-Iran Conflict: इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ क्षेपणास्त्र हल्ला
गेल्या दोन आठवड्यांपासून या दोन देशात एकमेकांवर हवाई हल्ला करून प्रतिउत्तराचे सत्र चालूच आहे. बुधवारी रात्री उशिरा पुन्हा एकदा इराकची राजधानी बगदादमधील ग्रीन झोनमध्ये दोन क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असा दावा इराणने केला आहे. अमेरिकेच्या दूतावासापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर हा हल्ला करण्यात आला. मात्र, अद्याप कोणीही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
US-Iran Conflict: इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून या दोन देशात एकमेकांवर हवाई हल्ला करून प्रतिउत्तराचे सत्र चालूच आहे. बुधवारी रात्री उशिरा पुन्हा एकदा इराकची राजधानी बगदादमधील ग्रीन झोनमध्ये दोन क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असा दावा इराणने केला आहे. अमेरिकेच्या दूतावासापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर हा हल्ला करण्यात आला. मात्र, अद्याप कोणीही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
बुधवारी इराणने इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर 12 क्षेपणास्त्रे डागली होती. या हल्ल्यात अमेरिकेचे 30 सैनिक मारले गेले असल्याचा दावा इराणने केला होता. परंतु, अमेरिकेने हा दावा फेटाळला होता. 5 जानेवारीलाही बगदादच्या ग्रीन झोनमध्ये इराण समर्थकांनी क्षेपणास्त्र डागली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा अमेरिकन दूतावासाच्या परिसरात क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आहे. बुधवारी रात्री करण्यात आलेल्या हल्ल्यातील एक क्षेपणास्त्र अमेरिका दुतावासापासून 100 मीटर अंतरावर कोसळलं. सुदैवाने यात कोणतही नुकसान झालेलं नाही. (हेही वाचा - All is Well! सध्या तरी आमच्याकडे जगातील सर्वात शक्तिशाली आणि सुसज्ज सैन्य; इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं सूचक ट्विट)
अमेरिका आणि इराणमधील वाद अधिक चिघळत चालला आहे. अमेरिका-इराण हे दोन्ही देश एकमेकांना हल्ल्याच्या माध्यमातून प्रतिउत्तर देत आहेत. तसेच हे प्रतिउत्तराचे सत्र सुरू असतानाच मागील आठवड्यात इराणमधील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या जामकरण मशिदीवर लाल झेंडा फडकवण्यात आला होता. याचा अर्थ इराणने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारल्याचा हा संकेत आहे, असं म्हटलं जात आहे.