Donald Trump यांचे ट्विटर अकाउंट ब्लॉक केल्यांनतर Twitter च्या मार्केट कॅप मध्ये 5 अब्ज डॉलर्सची घसरण; इतरही सोशल मिडिया कंपन्यांचे नुकसान
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे ट्विटर अकाउंट (Twitter Account) निलंबित झाल्यानंतर सोशल मीडिया कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड घट झाली आहे. सोशल मीडियावरून ट्रम्प यांच्या निघून जाण्याने कंपन्यांना मोठे नुकसान झाले आहे. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या हिंसाचारानंतर ट्विटरने ट्रम्प यांचे वैयक्तिक खाते कायमचे ब्लॉक केले आहे
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे ट्विटर अकाउंट (Twitter Account) निलंबित झाल्यानंतर सोशल मीडिया कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड घट झाली आहे. सोशल मीडियावरून ट्रम्प यांच्या निघून जाण्याने कंपन्यांना मोठे नुकसान झाले आहे. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या हिंसाचारानंतर ट्विटरने ट्रम्प यांचे वैयक्तिक खाते कायमचे ब्लॉक केले आहे. या निर्णयानंतर, सोमवारी वॉल स्ट्रीटमध्ये ट्विटर शेअर्स जवळपास 12 टक्क्यांनी घसरल्याचे दिसून आले, त्यानंतर कंपनीचे मार्केट कॅपचे 5 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. फेसबुक शेअर्समध्येही जवळपास 4 टक्क्यांनी घट दिसून झाली.
याशिवाय गुगलच्या मालकीच्या कंपनी अल्फाबेट इंकच्या समभागातही सुमारे 2.31 टक्के तोटा झाला. ट्रम्प यांचे खाते निलंबित केल्यामुळे सोशल मीडिया कंपन्यांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.
इतर कंपन्यांचे झालेले नुकसान -
नॅस्डॅकवर अॅमेझॉनचे शेअर्स सुमारे 2.15 टक्क्यांनी घसरले.
Apple च्या स्टॉक्समध्येही सुमारे 2.31 टक्के
PayPal च्या समभागात 2.05 टक्के घट झाली.
अॅडोब इंक (Adobe Inc) चे शेअर्स 2.24 टक्क्यांनी घसरले.
ट्रम्प समर्थकांचे म्हणणे आहे की या सोशल मीडिया नेटवर्कने ट्रम्पवर अन्याय केला आहे आणि फ्री स्पीच अधिकाराचे उल्लंघन केले आहे. त्यांच्यामध्ये ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामबद्दल प्रचंड नाराजी आहे. अशा परिस्थितीत या कंपन्या त्यांचे युजर्स गमावू शकतात. कॅपिटल हिल हिंसाचारानंतर भविष्यातील हिंसाचाराच्या आशंकामुळे ट्रम्प यांचे खाते निलंबित केले गेले आहे. (हेही वाचा: Arrest Warrant against Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात इराक कोर्टाने जारी केले अटक वॉरंट; जाणून घ्या काय आहे प्रकरण)
दरम्यान, 2009 मध्ये ट्रम्प यांनी ट्विटरवर खाते तयार केले होते. ट्रम्प यांचे खाते निलंबित होईपर्यंत त्यांचे 89 दशलक्ष फॉलोअर्स झाले होते. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प 51 जणांना फॉलो करत होते. गेल्या 12 वर्षात त्यांनी 57 हजार ट्वीट केले आहेत. यामध्ये केवळ टेक्स्टवाले 30,572 ट्विट आहेत. याशिवाय 3,624 ट्वीटला उत्तर देण्यात आले. 12,906 लिंक्स किंवा फोटो ट्विट केले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)