Twitter Suspend in Nigeria: नायजेरीयामध्ये ट्विटर निलंबीत; राष्ट्रपती मोहम्मदु बुहारी यांचे अकाऊंट बंद करणे भोवले

नायजेरियाच्या कॉर्पोरेट अस्तित्वाला धक्का पोहोचविण्यासाठी तसेच त्यासाठी काही कृतींमध्ये सहभागी असलेल्या लोकांना समर्थनार्थ वर्तन केल्याचा ठपका ठेवत नायजेरियाने ही कारवाई केली आहे.

Muhammadu Buhari | (Photo Credits: Facebook)

भारतामध्ये ट्विटर (Twitter) विरुद्ध केंद्र सरकार असा सामना रंगला आहे आणि केंद्र सरकारने ट्विटरला निर्वाणचा इशाराही दिला आहे. या सामन्याचा शेवट काय होतो याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. दरम्यान, नायजेरीयामध्ये ट्विटरला एक जोरदार झटका बसला आहे. नायजेरीयन सरकारने (Nigeria Government) ट्विटरला नायजेरीया देशात निलंबीत (Twitter Suspend in Nigeria) केले आहे. ट्विटरने नायजेरीयाचे राष्ट्रपती मोहम्मदु बुहारी यांचे अकाऊंट नुकतेच बंद केले होते. या घटनेनंतर नायजेरीया सरकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, ट्विटरवरील कारवाईबाबत सांगताना नायजेरीयाने अमेरिकन मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या या कंपनीवर देशात दुटप्पी वर्तन केल्याचा आरोप केला आहे. पश्चिम अफ्रिकी देशांमध्ये ट्विटरने विघटनवादी शक्तींचे समर्थ केल्याचे नायजेरीयाने म्हटले आहे.

वृत्तसंस्था सिन्हुआच्या हवाल्याने दिलेल्या वृत्ता आयएनएसने म्हटले की, नायजेरियाच्या कॉर्पोरेट अस्तित्वाला धक्का पोहोचविण्यासाठी तसेच त्यासाठी काही कृतींमध्ये सहभागी असलेल्या लोकांना समर्थनार्थ वर्तन केल्याचा ठपका ठेवत नायजेरियाने ही कारवाई केली आहे. नायजेरियाने अनिश्चित काळासाठी ट्विटरवर निलंबनाची कारवाई केली. नायजेरीयाचे माहिती आणि सांस्कृतिक मंत्री लाई मोहम्मद यांनी शुक्रवारी म्हटले की नायजेरियाच्या संघीय सरकारने राष्ट्रीय प्रसारण आयोगाला नायजीरियामध्ये सर्व ओटीटी आणि सोशल मीडिया संचालनांना परवाना देण्याची प्रक्रिया तातडीने सुरु केली आहे. (हेही वाचा, )

सरकारने देशातील ट्विटर संचालनाबाबत संशय व्यक्त केला. त्यानंतर राष्ट्रपती मुहम्मद बुहारी यांचे ट्विट ट्विटरने हटवले. या ट्विटमध्ये बुहारी यांनी 1967 ते 1970 मध्ये देशात 30 महिने झालेल्या गृह युद्धाचा संदर्भ दिला होता. तसेच, ट्विटपोस्टद्वारे इशारा दिला होता की, ज्या लोकांना हे सरकार अपयशी ठरेल असे वाटते आहे त्यांनी स्वत:ला त्रासात टाकणाऱ्या त्रासापासून वाचवावे.

राष्ट्रपती मोहम्मदु बुहारी यांनी मंगळवारी रात्री ट्विट करत म्हटले होते की, आज गैरवर्तन करणाऱ्यांपैकी काही नायजीरियन गृहयुद्धावेळी झालेल्या नुकसान आणि परिणाम समजून घेण्याबाबत अगदीच छोटे आहेत. आमच्यापैकी जे लोक 30 महिन्यांपर्यंत मैदानात राहिले आहे, जे युद्धातून गेले आहे ते त्यांच्यासोबत तशाच पद्धतीने व्यवहार करतील. जी भाषा त्यांना समजते. दरम्यान, टीकाकारांनी मोठ्या प्रमाणावर टीका केल्यानंतर ट्विटरने राष्ट्रपती मोहम्मदु बुहारी यांचे ट्विट हटवले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif