Twitter Staff Bringing Toilet Paper To Office: ट्विटर कर्मचार्यांना घरून आणावा लागत आहे टॉयलेट पेपर; पैसे वाचवण्यासाठी Elon Musk यांचा नवा फंडा
या महिन्याच्या सुरुवातीला सॅन फ्रान्सिस्को मुख्यालयातील स्वच्छता सेवा रद्द करण्यात आली आहे.
Twitter Staff Bringing Toilet Paper To Office: एलॉन मस्क (Elon Musk) ने कंपनीच्या रखवालदाराला कामावरून काढून टाकल्यानंतर ट्विटर (Twitter) कर्मचार्यांना त्यांचे स्वतःचे टॉयलेट पेपर (Toilet Paper) ऑफिसमध्ये आणावे लागत आहेत, असे एका अहवालात म्हटले आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या न्यूयॉर्क कार्यालयातील सफाई कर्मचार्यांना कामावरून काढले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सॅन फ्रान्सिस्को मुख्यालयातील स्वच्छता सेवा रद्द करण्यात आली आहे.
एलॉन मस्क यांनी कंपनीने सॅन फ्रान्सिस्को कार्यालयात चार मजले बंद केले आहेत. तसेच सर्व कर्मचारी दोन मजल्यांवर हलवले आहेत. पैसे वाचवण्यासाठी मस्क यांनी हा निर्णय घेतला. द न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, माजी कर्मचार्यांच्या म्हणण्यानुसार, “लोक अधिक बंदिस्त जागेत पॅक केल्यामुळे, उरलेल्या अन्नपदार्थाचा वास आणि शरीराचा गंध मजल्यांवर रेंगाळत आहे.” (हेही वाचा - Twitter Down Funny Memes: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर डाऊन झाल्यानंतर सोशल मीडियावर मजेदार मीम्स आणि जोक्सचा वर्षाव!)
कार्यालयातील स्नानगृहे अस्वच्छ झाली आहेत, असे या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच साफ-सफाई सेवा मोठ्या प्रमाणात संपुष्टात आल्याने, काही कामगारांनी घरून टॉयलेट पेपरचे स्वतःचे रोल आणावे लागत आहे.
याविषयी एलॉन मस्क यांना विचारले असता मस्क यांनी याची पुष्टी करताना लिहिले: “BYOTP! Lol, अर्ध्या दिवसासाठी ते खरे होते.” ट्विटरने वॉशिंग्टन राज्यातील 208 कामगारांना कामावरून काढून टाकले आहे आणि प्लॅटफॉर्मरच्या म्हणण्यानुसार, त्याच्या सिएटल कार्यालयातून बेदखल होण्याचा सामना करावा लागत असल्याने ते आता कायमचे बंद केले जातील.
एलॉन मस्क यांनी ऑक्टोबरमध्ये $ 44 अब्जांना ट्विट विकत घेतले. पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी कंपनीच्या सुमारे 75 टक्के कर्मचार्यांना काढून टाकले आहे. 2022 मध्ये टेस्लाच्या स्टॉकची किंमत घसरली असून बाजार मूल्यात सुमारे $700 अब्जची घट झाली आहे.