Twins Baby: ऐकावं ते नवलचं! जुळ्या बाळांचे दो-दो बाप, दोन्ही बाळांची आई एक मात्र वडिल वेगवेगळे
डॉक्टरांसाठी देखील ही आश्चर्यकारक बाब होती पण लाखांमध्ये अशी शक्यता असते आणि हे घडू शकत असं डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
हे कलीयुग आहे कलीयुगात काय कधी होईल हे सांगता येत नाही असं वाक्य तुम्ही तुमच्या आजी-आजोबांकडून एकदा तरी ऐकलचं असाल. पण दिवसेंदिवस असे काही प्रकार कानावर पडत आहेत की ऐकावं ते नवलचं असचं म्हणण्याची वेळ आली आहे. एकावेळी एकाचं महिलेला ट्विन्स म्हणजे तुम्ही बरेचदा बघितल असाल. किंबहुना मुलं दोन असलीत तरी त्यांचे आई वडिल मात्र एकचं असतात. पण ब्राझिल मधून एक अशी काही घटना पुढे आली आहे. जी ऐकुन तुम्ही पण तुमच्या डोक्याला हात मारुन घ्याल. त्याचं झालं असं की ब्राझिल मधल्या एका १९ वर्षिय तरुणीने दोन जुळ्या गोंडस बाळांना जन्म दिला. पण जन्म दिल्या नंतर ही तरुणी दोन्ही बाळांचं संगोपन स्वत एकटीचं करु लागली. बघता बघता ही दोन्ही मुल एक वर्षाची आणि जरा कळती झाली. तेव्हा आता ही मुल काही दिवसांनी मला आमचे वडिल कोण असा प्रश्न विचारतील अशी शंका आली आणि तरुणीने पॅटरनिटी टेस्ट करवून घेतली.
तरी या टेस्टमध्ये असा काही खुलासा झाला की या जुळ्या मुलांना जन्म देणारी तरुणी देखील चक्रावून गेली. तरुणीने पॅटरनिटी टेस्ट केली असता या दोन्ही मुलांचे वडिल वेगवेगळे आहेत अशी माहिती पुढे आली. डॉक्टरांसाठी देखील ही आश्चर्यकारक बाब होती पण लाखांमध्ये अशी शक्यता असते आणि हे घडू शकत असं डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तरी या तरुणीने संभ्रम दूर करण्यासाठी ही टेस्ट केली होती पण या टेस्टमुळे आता तरुणी आणखीचं गोंधळात पडली आहे. (हे ही वाचा:- Indian Driver Won Lottery In UAE: छप्पर फाड के! भारतीय चालकास UAE मध्ये तब्बल 33 कोटींची लॉटरी)
हे कसे घडले असा प्रश्न तुम्हाला पडलाचं असेल पण ही घटना वैज्ञानिक जगात क्वचितच घडते असं डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आलं. जुळ्या बाळांच्या आईने मीडियाला प्रतिक्रिया देताना सांगितले की, तिचे दोन पुरुषांसोबत शारिरीक संबंध होते. तरी माझ्यासोबत असे कधी घडेल असे मला वाटले नव्हते. पण लाखांत क होणाऱ्या या घटनेत एका तरुणीच्या दोन जुळ्या मुलांचे बाप वैज्ञानिक तपासणीनुसार वेगवेगळे असल्याने चर्चांणा उधान आलं आहे.