Tupperware Plans to File for Bankruptcy: लोकप्रिय कंटेनर कंपनी टपरवेअर दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; लवकरच सुरु करणार प्रक्रिया- Report
सोमवारी शेअर्स 43 सेंट्सवर बंद झाले, जे 15.8% च्या घसरणीचे प्रतिनिधित्व करते.
Tupperware Plans to File for Bankruptcy: साधारण 1942 मध्ये स्थापन झालेली प्रसिद्ध किचनवेअर (Tupperware) कंपनी टपरवेअर आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. कंपनीने नुकतेच उघड केले आहे की, त्यांनी $700 दशलक्ष कर्जाचे व्यवस्थापन करण्यासाठी दीर्घ वाटाघाटीनंतर कायदेशीर आणि आर्थिक सल्लागारांची नियुक्ती केली आहे. यासह, टपरवेअर या आठवड्याच्या अखेरीस दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करू शकते. ब्लूमबर्ग न्यूजच्या रिपोर्टनुसार, टपरवेअरने आपल्या कर्जाच्या अटींचे उल्लंघन केले आहे, ज्यामुळे कंपनीने न्यायालयीन संरक्षणाची योजना आखली आहे.
अहवालानुसार, कंपनीची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे आणि तिच्या शेअर्समध्ये 57% ची मोठी घसरण दिसून आली आहे. सोमवारी शेअर्स 43 सेंट्सवर बंद झाले, जे 15.8% च्या घसरणीचे प्रतिनिधित्व करते. कोविड साथीच्या आजारादरम्यान, टपरवेअरच्या विक्रीत अचानक वाढ झाली कारण लोक घरीच राहून अधिक स्वयंपाक करत होते आणि भरपूर उरलेले अन्न साठवण्यासाठी टपरवेअर उत्पादने वापरत होते. पण जसजसे लॉकडाऊन उघडत गेले, तसतसे विक्रीत घट झाली, ज्यामुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला.
अहवालानुसार, $700 दशलक्ष (रु. 5870.53 कोटी) पेक्षा जास्त कर्जाचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल टपरवेअर आणि त्याच्या कर्जदारांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. मार्चमध्ये कंपनीने चेतावणी दिली होती की, ती आपल्या व्यवसायाच्या सातत्याबद्दल अनिश्चिततेचा सामना करत आहे. आता कंपनी दिवाळखोरीच्या दिशेने पावले टाकत आहे, ज्यामुळे तिचे आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. मात्र टपरवेअरने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. (हेही वाचा; जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी Microsoft ने पुणे येथील हिंजवडीत खरेदी केली 1 हजार कोटीची जमीन)
दरम्यान, टपरवेअर ही एक अमेरिकन कंपनी आहे जी स्वयंपाकघर आणि घरासाठी स्टोरेज वसर्व्हिंग कंटेनर बनवते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वितरित करते. त्याची स्थापना 1942 मध्ये अर्ल टपरने केली होती, ज्याने आपला पहिला बेल-आकाराचा कंटेनर विकसित केला आणि 1946 मध्ये उत्पादने लोकांसमोर आणली.