अमेरिका: ख्रिसमस पार्टीत लागलेल्या आगीत भारतातील तीन सख्ख्या भावंडांचा मृत्यू
अमेरिकेतील कोलिरीविले येथील ख्रिसमस पार्टीत लागलेल्या आगीत तीन भारतीय बालकांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेतील कोलिरीविले (Collierville) येथील ख्रिसमस पार्टीत लागलेल्या आगीत तीन भारतीय बालकांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही सख्खे भाऊ-बहीण असून भारतातील तेलंगणाचे मूळ रहिवासी होते. त्याचबरोबर कॅरी कॉड्रिएट (55) या महिलेचा देखील मृत्यू झाला आहे. शेरॉन (17), जॉय (15) आणि एरॉन (14) अशी आगीत मृत झालेल्या तीन भावंडांची नावे आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार, कॉड्रिएट (Coudriet) यांच्या घरी रात्री 11 वाजता लागली. कॉड्रिएट कुटुंबियांनी घरी ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले होते. त्या पार्टीला ही तिन्हीही मुले उपस्थित होती. या आगीत या मुलांचा नाहक बळी गेला. ही तिन्हीही मुले मिसिसिपी येथील French Camp Academy मध्ये शिकत होती. अधिकारी या दुर्घटनेची सलोख चौकशी करत आहेत.
पार्टी आयोजित करणारे कॅरीचे पती डॅनी आणि त्यांचा मुलगा कोल या आगीपासून सुखरुप बचावले आहेत. तेलंगणाच्या नलगोंडा जिल्ह्यातील श्रीनिवास नाईक आणि सुजाता नाईक हे मृत मुलांचे पालक आहेत.