थेरेसा मे यांचा Brexit करार ब्रिटन संसदेत अमान्य
ब्रिटिश संसदेत पंतप्रधान थेरेसा मे यांनी मांडलेला ब्रेक्झिट करार खासदारांनी अमान्य केला आहे.
Brexit Draft: ब्रिटिश संसदेत पंतप्रधान थेरेसा मे (Theresa May) यांनी मांडलेला ब्रेक्झिट (Brexit) करार खासदारांनी अमान्य केला आहे. यावर मंगळवारी ब्रिटन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात मतदान घेण्यात आले. मात्र यावर केवळ 202 खासदारांनी कराराच्या बाजूने मतं दिले. तर कराराला विरोध करणाऱ्या खासदारांची संख्या 423 आहे.
थेरेसा मे यांचा करार अपरिपक्व असल्याचा आरोप करत ब्रेक्झिटचे सेक्रेटरी आणि परराष्ट्र मंत्री डॉमनिक राब (Dominic Raab) आणि भारतीय वंशाचे मंत्री शैलेंद्र वारा यांच्यासह काही मंत्र्यांनी राजीनामे दिले होते.
लिस्बन कराराचे 50 वे कलम ब्रिटनने लागू केले असून ब्रेक्झिटच्या औपचारिक प्रक्रियेला सुरुवात केली. ब्रेक्झिटनंतर ब्रिटनचे उर्वरित युरोपीय महासंघाशी चांगले संबंध टिकून राहावेत यासाठी हा करार केला जात आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Advertisement
Advertisement
Advertisement