America: 10 मिनिटांत अचानक 28 हजार फूट खाली उतरले विमान; नंतर मार्ग बदलून परतले विमानतळावर, नेमकं काय घडलं? वाचा
फ्लाइट अवेअर डेटाचा हवाला देऊन, अमेरिकन मीडियाने वृत्त दिले की, नेवार्क ते टोम या विमानाने नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रात्री 8:37 वाजता उड्डाण केले.
America: अमेरिकेत एका विमानात एक भयानक घटना घडली. न्यू जर्सीच्या (New Jersey) नेवार्क विमानतळावरून युनायटेड एअरलाइन्सचे विमान (US Airlines Flight) झेपावले. मात्र, अवघ्या 10 मिनिटांत हे विमान 28,000 फूट खाली उतरले. इतकेच नाही तर शेकडो प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान अचानक इतक्या खाली आल्यानंतर आपल्या मार्गावरून वळले आणि प्रवाशांना नेवार्क विमानतळावर घेऊन गेले.
बोईंग 777 विमानात 270 प्रवासी आणि 40 केबिन क्रू होते. फ्लाइट अवेअर डेटाचा हवाला देऊन, अमेरिकन मीडियाने वृत्त दिले की, नेवार्क ते टोम या विमानाने नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रात्री 8:37 वाजता उड्डाण केले. ते मध्यरात्री 12:27 वाजता विमानतळावर परत आले. (हेही वाचा -Santiago Flight 513: एक भयानक विमान जे 92 लोकांसह उड्डाण करुन झाले गायब आणि तब्बल 35 वर्षांनी सांगाड्यांनी भरलेल्या अवस्थेत विमानाने केले लॅंडीग)
विमान कंपनीने एक निवेदन जारी करून सांगितले की, केबिनचा दाब कमी झाल्यामुळे विमानाला नेवार्कला परतावे लागले. विमान सुरक्षितपणे पोहोचले. फेडरेशन एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशननेही दबावाची समस्या मान्य करत केबिनमध्ये दबाव नसल्यामुळे वैमानिकाला विमान वळवण्यास भाग पडलं असं सांगितलं. दाब कमी झाल्याने विमान 10 मिनिटांत 28,000 पर्यंत खाली आले.
विमानातील सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानात बसवून त्यांच्या गंतव्यस्थानी नेण्यात आल्याचे एअरलाइन्सने सांगितले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही अशीच घटना घडली होती. युनायटेड एअरलाइन्सच्या UA1722 विमानाने माउई येथील काहुलुई विमानतळावरून सॅन फ्रान्सिस्कोला उड्डाण केले आणि ते अचानक 22,000 फुटांवरून खाली आले.