हाफिज सईदच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागे रॉ एजेंटचा हात, पाकिस्तानने लावला आरोप
पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी आरोप लावला आहे की, गेल्या महिन्यात लाहौर मध्ये 2008 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदच्या (Hafiz Saeed) घरावर जो बॉम्बस्फोट घडवून आणला त्यामध्ये एका भारतीय नागरिकाचा हात होता.
पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी आरोप लावला आहे की, गेल्या महिन्यात लाहौर मध्ये 2008 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदच्या (Hafiz Saeed) घरावर जो बॉम्बस्फोट घडवून आणला त्यामध्ये एका भारतीय नागरिकाचा हात होता. लाहौरच्या जौहर टाउनमध्ये राजस्व बोर्ड हाउसिंग सोसाइटीमध्ये हाफिज सईदच्या घराबाहेर 23 जून रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात 3 लोकांचा मृत्यू झाला. तर अन्य 24 जण गंभीर स्वरुपात जखमी झाले. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.
पंजाब पोलीस प्रमुख आणि सूचना मंत्री फवाद चौधरी यांच्या सोबतच्या एका पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी म्हटले की, हल्ल्याचा मास्टरमाइंड एक भारतीय आहे. ज्याचा संपर्क गुप्त एजेंसी सोबत आहे.(इस्लामाबाद येथील भारतीय दूतवासाच्या वर ड्रोन दिसल्याने सरकाराची चिंता वाढली)
तर मोईद युसूफ यांनी म्हटले, या दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेले फॉरेंसिक विश्लेषण, इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या माध्यमातून आम्ही मुख्य मास्टरमाइंट आणि या दहशतवादी संघटनेच्या संचालकांची ओळख पटवली आहे. आम्हाला तुम्हाला कळवताना कोणताही संदेह किंवा आपत्ती नाही आहे की, मुख्य मास्टरमाइंड भारतीय खुफिया एजेंसी रॉ चा आहे. जो भारतात राहतो. त्यांनी कोणाची ही ओळख जाहीर केलेली नाही.
आपल्या पत्रकार परिषदेत मोईद युसूफ यांनी म्हटले की, सरकारकडे बनावट नावे, खरी ओळख आणि संदिग्ध ठिकाणे आहेत. कारण विविध एजेंसिच्या मदतीने ही बाब समोर आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी ट्विट केले होते की, त्यांनी आपली टीमला आज हल्ल्याप्रकरणी तपासाच्या निष्कर्षासंदर्भात राष्ट्राला माहिती देण्याचे निर्देशन दिले होते.(Watch Video: पाकिस्तान पंतप्रधान इमरान खानच्या माजी महिला सहाय्यकाने खासदाराच्या लगावली कानशिलात, पहा व्हायरल व्हिडिओ)
त्यांनी असे ही म्हटले होते की, नागरिक आणि सैन्य गुप्त एजेंसीच्या दरम्यान उत्तम समन्वयाने दहशतवादी आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय संबंधांचा खुलासा केला आहे. तर हाफिज सईद याला संयुक्त राष्ट्रांनी सुद्धा दहशतवादी ठरवले आहे. हाफिज सईदवर अमेरिकेने 10 मिलियन डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. त्याना टेरर फायनान्सिंगच्या पाच प्रकरणी 36 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.