Terrorist Attack: नायजेरियातील मशिदीवर दहशतवादी हल्ला, अंदाधुंद गोळीबारात 9 जणांचा मृत्यू

हल्लेखोराकडे आधुनिक शस्त्रे होती. ते मोटारसायकलवरून आले होते. त्यांनी साया-साया समुदायाच्या लोकांवर हल्ला केला, ज्यात 9 लोकांचा मृत्यू झाला.

Terrorist Attack: नायजेरियातील मशिदीवर दहशतवादी हल्ला, अंदाधुंद गोळीबारात 9 जणांचा मृत्यू
Terrorist | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

नायजेरियातील कडुना राज्यातील इकारा येथे शुक्रवारी संशयित दहशतवाद्यांनी मशिदीवर हल्ला केला. या हल्ल्यात 9 नमाज्यांचा मृत्यू झाला. इकाराच्या स्थानिक सरकारचे प्रतिनिधीत्व करणारे सदस्य अलहसन मुहम्मद यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी मशिदीवर हल्ला केला. शुक्रवारी ईशाच्या नमाजानंतर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती अलहसन मुहम्मद यांनी दिली. हल्लेखोराकडे आधुनिक शस्त्रे होती. ते मोटारसायकलवरून आले होते. त्यांनी साया-साया समुदायाच्या लोकांवर हल्ला केला, ज्यात 9 लोकांचा मृत्यू झाला.

पाहा व्हि़डिओ  -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2023 09:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).