Bomb Blast in Pakistan: पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला; बलुचिस्तानच्या बाजारपेठेत पोलिसांच्या वाहनात ठेवला बॉम्ब; तिघांचा मृत्यू, पोलिसांसह 16 जण जखमी
तर जखमींमध्ये पोलिसांसह काही नागरिकांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
Bomb Blast in Pakistan:रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम पाकिस्तानमध्ये शनिवारी हा दहशतवादी हल्ला(Terrorism) झाला. पिशीनमधील पोलिस मुख्यालयाजवळ मोटारसायकलला रिमोट-नियंत्रित बॉम्ब (Bomb Blast)जोडला होता. स्फोटात जखमी झालेल्यांमध्ये सात पोलिसांचा समावेश आहे. (Terrorist Attack in Pakistan: पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला! खैबर पख्तुनख्वामध्ये 2 पोलीस ठार)
याआधीही पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहे. तहरीक-ए-तालिबानने 2022 मध्ये सरकारसोबतचा युद्धविराम करार मोडल्यानंतर आणि सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, पाच जखमींची प्रकृती गंभीर असून दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्वांवर उपचार सुरू आहेत. दोन पीडितांना ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.(Terrorist Attack On Pak Army: पाकिस्तानमध्ये लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, 6 जवान शहीद, 5 जखमी)
पिशीन सिटी स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) मुजीबूर रहमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन जखमी पोलिसांची प्रकृती चिंताजनक आहे. हल्ल्यात तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. दहशतवादविरोधी विभाग आणि बॉम्ब निकामी पथकाने तपासासाठी पुरावे गोळा केले आहेत.
राज्य प्रसारक पीटीव्ही न्यूजनुसार, पिशीनच्या उपायुक्त कार्यालयाजवळ हा स्फोट झाला.
तिघांचा मृत्यू, पोलिसांसह 16 जण जखमी
पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी या घटनेची निंदा केली असून, रेडिओ पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, "लहान मुलांवर हल्ला करणारे भ्याड दहशतवादी मानव म्हणण्यास पात्र नाहीत." त्यांनी जखमींना शक्य तितके वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. घटनेला जबाबदार असलेल्यांची ओळख पटवून त्यांना शिक्षा देण्याचे आवाहन केले आहे. गेल्या महिन्यात, पिशीनमध्ये सुधारित स्फोटक यंत्राद्वारे (IED) झालेल्या स्फोटात तीन CTD अधिकारी आणि तीन नागरिक जखमी झाले होते. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या सीटीडी वाहनावर हा हल्ला करण्यात आला होता.