Taliban Official Gay Sex: तालिबानी अधिकाऱ्याचे बॉडीगार्डसोबत 'समलैंगिक संबंध'; सेक्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल (Watch Video)

ह्यूमन राइट्स वॉच आणि आउट राइट अॅक्शन इंटरनॅशनलने निरीक्ष नोंदवले होते की, तालिबान अंतर्गत, लेस्बियन, गे, बायसेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर (एलजीबीटी) किंवा जे देशाच्या कठोर लिंग नियमांचे पालन करत नाहीत त्यांना भयावह परिस्थिती आणि शिक्षेला सामोरे जावे लागते.

Taliban Official Gay Sex (संग्रहित संपादित प्रतिमा)

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने (Taliban) सत्ता काबीज केल्यानंतर अनेक नवे निर्बंध लागू करण्यात आले. तालिबान पहिल्यापासूनच समलैंगिक संबंधांच्या (Gay Relation) विरोधात आहे. अशात देशातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. अहवालानुसार, या व्हिडिओमध्ये तालिबानचा एक वरिष्ठ अधिकारी आणि दा अफगाणिस्तान ब्रेश्ना शेरकत (DABS) चा प्रमुख मुल्ला अहमद अखुंद त्याच्या 21 वर्षीय अंगरक्षकासोबत समलैंगिक संबंध प्रस्थापित करताना दिसत आहे. सध्या सोशल मिडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

महत्वाचे म्हणजे, हा व्हिडिओ समोर आल्यानंतरही समलैंगिकतेला चूक मानणाऱ्या आणि समलैंगिकांना दगडाने ठेचून ठार मारण्याची शिक्षा देणाऱ्या तालिबानने मुल्ला अहमद अखुंद याच्यावर अजूनतरी कोणतीही कारवाई केली नाही. अजूनही तो त्याच्या पदावर कायम आहे.

सोशल मिडियाद्वारे समोर आलेल्या एका छुप्या कॅमेऱ्यातून रेकॉर्ड झालेल्या फुटेजमध्ये दिसत आहे की, मुल्ला अहमद अखुंद बेडवर कपडे काढतो आणि बेडवर जाऊन झोपतो. त्यानंतर तिथे त्याचा अंगरक्षक येतो, जो स्वतःचे कपडे काढतो आणि अखुंदसोबत रजाईच्या आत जाऊन झोपतो. या तरुणाने पूर्वी ब्रेस्ना शेरकटमध्ये तालिबान नेत्यासोबत काम केले होते. विशेष म्हणजे तो समूहाचे उप संरक्षण मंत्री मुल्ला मोहम्मद फजल याच्या सहवासातही दिसला होता. महिलांवर कडक निर्बंध लादणारा तालिबान आता मुल्ला अहमद अखुंदच्या व्हिडिओवर मौन बाळगून आहे.

ह्यूमन राइट्स वॉच आणि आउट राइट अॅक्शन इंटरनॅशनलने निरीक्ष नोंदवले होते की, तालिबान अंतर्गत, लेस्बियन, गे, बायसेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर (एलजीबीटी) किंवा जे देशाच्या कठोर लिंग नियमांचे पालन करत नाहीत त्यांना भयावह परिस्थिती आणि शिक्षेला सामोरे जावे लागते. (हेही वाचा: Taliban Bans Political Parties: अफगाणिस्तानमधील लोकशाही संपली; तालिबानने घातली सर्व राजकीय पक्षांवर बंदी)

तालिबानच्या उपपंतप्रधानांच्या निर्देशानुसार या वर्षी 20 ऑगस्ट रोजी मुल्ला अहमद अखुंद याची DABS चे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली होती. त्याने आपल्या सुरुवातीच्या भाषणात सांगितले होते की, तो काबूलच्या ब्रेश्ना विभागात ‘मूलभूत कार्य’ करेल. उल्लेखनीय म्हणजे, DABS ही एक स्वतंत्र आणि स्वायत्त कंपनी आहे, जी कॉर्पोरेशन आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान (IROA) च्या मर्यादित दायित्व कायद्यांतर्गत स्थापन झाली आहे. ही कंपनी विद्युत उर्जा निर्मिती, आयात, प्रसारण आणि वितरण चालवते आणि व्यवस्थापित करते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif