Taiwan Earthquakes Today: भूकंपाच्या जोरदार धक्क्याने तैवान हादरला, जमीन खाली आला होता ५.६ रिश्टर स्केल इतका तीव्र भूकंप
सेंट्रल वेदर एजन्सी आणि यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, तैवानमध्ये भूकंपाचे अनेक धक्के जाणवले, परंतु ५.६ रिश्टर स्केलतीव्रतेचा सर्वात तीव्र भूकंप सकाळी १० वाजून ११ मिनिटांनी चियायी काउंटीमधील दापू शहरात १० किलोमीटर खोलीवर आला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी तैपेईपासून सुमारे २५० किलोमीटर (१५५ मैल) दक्षिणेला होता. या भूकंपामुळे तैपेईतील इमारती हादरल्या.
Taiwan Earthquakes Today: सेंट्रल वेदर एजन्सी आणि यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, तैवानमध्ये भूकंपाचे अनेक धक्के जाणवले, परंतु ५.६ रिश्टर स्केलतीव्रतेचा सर्वात तीव्र भूकंप सकाळी १० वाजून ११ मिनिटांनी चियायी काउंटीमधील दापू शहरात १० किलोमीटर खोलीवर आला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी तैपेईपासून सुमारे २५० किलोमीटर (१५५ मैल) दक्षिणेला होता. या भूकंपामुळे तैपेईतील इमारती हादरल्या. त्याच्या काही वेळानंतर दापूमध्ये किमान १२ किरकोळ धक्के जाणवले. सध्या तरी जीवित किंवा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. हे २१ जानेवारी रोजी दापूमध्ये झालेल्या ६.४ तीव्रतेच्या भूकंपानंतरचे धक्के होते. दापूमध्ये २१ जानेवारी रोजी झालेल्या भूकंपात १५ जण किरकोळ जखमी झाले आणि इमारतींना तसेच एक महामार्ग पुलाला नुकसान झाले.
गेल्या वर्षी एप्रिलमहिन्यात बेटाच्या पूर्व किनाऱ्यावरील हुआलियन या डोंगराळ भागात ७.४ रिश्टर स्केलतीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्यात किमान १३ जणांचा मृत्यू झाला होता आणि १,००० हून अधिक जण जखमी झाले होते.
(The above story first appeared on LatestLY on Jan 30, 2025 03:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

