Taiwan Earthquake: तैवानच्या नैर्ऋत्येकडील डोलियू येथे ६.० रिश्टर स्केलतीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसल्याने राजधानी तैपेईमधील इमारती हादरल्या. युरोपियन मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटरने (ईएमएससी) दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप 13 किलोमीटर खोलीवर झाला. तैवानच्या हवामान खात्याने याला दुजोरा दिला आहे. अनेक शहरांमध्ये लोकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली. तैवानच्या अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, तैनान शहरातील एका इमारतीचे नुकसान झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. प्राथमिक अहवालानुसार मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नसले तरी स्थानिक प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. हेही वाचा: Tibet Earthquake: तिबेटमध्ये भूकंपामुळे मोठा विध्वंस; आतापर्यंत 53 जणांचा मृत्यू, 62 पेक्षा जास्त जखमी
तैवानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के
तैवान : भूकंपप्रवण क्षेत्र
तैवान दोन प्रमुख टेक्टोनिक प्लेट्सजवळ स्थित आहे, ज्यामुळे तो भूकंपासाठी अत्यंत असुरक्षित आहे. 2016 मध्ये तैवानच्या दक्षिण भागात झालेल्या भूकंपात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. १९९९ मध्ये ७.३ रिश्टर स्केलतीव्रतेच्या विनाशकारी भूकंपात दोन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.