Surgical Strike 2: लढाई करण्यापेक्षा आधी दहशतवाद्यांवर आवर घाला, अमेरिकेचा पाकिस्तानला सल्ला
आता अमेरिकेने (America) पाकिस्तानला ठणकावले असून लढाई करण्यापेक्षा तुमच्या देशातील दहशतवाद्यांवर आवर घाला असा सल्ला दिला आहे.
Surgical Strike 2: पुलवामा (Pulwama) दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तान विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. तसेच काल भारतीय वायुसेनेने (Indian Air Force) पाकव्याप्त काश्मिरवर हल्ला केल्याने पाकिस्तानची (Pakistan) झोप उडाली आहे. तर पाकिस्तान भारताला लवकरच प्रतिउत्तर देईल अशी घोषणा पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी मंगळवारी (26 फेब्रुवारी) केली. मात्र आता अमेरिकेने (America) पाकिस्तानला ठणकावले असून लढाई करण्यापेक्षा तुमच्या देशातील दहशतवाद्यांवर आवर घाला असा सल्ला दिला आहे.
अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने त्यांच्याकडून एक पत्रक जारी केले आहे. तसेच सध्याच्या परिस्थितवर विदेश मंत्री माइक पॉम्पियो (Mike Pompeo) यांनी भारत आणि पाकिस्तान विदेश मंत्र्यांसोबत बातचीत केली आहे. त्यांनी दोन्ही देशांना आपल्या क्षेत्रात शांतता राखण्यास अवाहन केले आहे. मात्र पाकिस्तानवर टीका करत पॉम्पियो यांनी असे म्हटले आहे की, पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवाद्यांची तळे लवकरात लवकर नष्ट करावी.(हेही वाचा-Surgical Strike 2: भारताने आपले नाक कापले, पाकिस्तान संसदेत इम्रान खान यांच्याविरुद्ध घोषणा)
यापूर्वी ही अमेरिकेने खूप वेळा पाकिस्तानला चेतावणी दिली होती. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पाकिस्तानला करण्यात येणारी मदत ही थांबवण्यात आली आहे. परंतु पाकिस्तान सुधारण्याचे नाव घेत नसल्याचे पॉम्पियो यांनी म्हटले आहे.