Sri Lanka Road Accident: श्रीलंकेत भीषण रस्ता अपघात, भरधाव वेगात बस पुलाला धडकून महावेली नदीत पडली, 11 जणांचा मृत्यू, 40 जखमी
बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात अनेक प्रवासी हे नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे.
भारताच्या दक्षिणेत असलेल्या श्रीलंका देशात मोठा रस्ते अपघात घडला आहे. श्रीलंकेत रविवारी 67 हून अधिक प्रवाशांना घेऊन अक्कराईपट्टूला जाणारी बस नदीत कोसळल्याने 11 जण ठार तर 40 जण जखमी झाले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. महावेली नदीत पडली. लष्कर आणि परिसरातील ग्रामस्थांकडून सध्या मदत आणि बचाव कार्य हे सुरु आहे. हा अपघात इतका भयानक होता की बस नदीत कोसळल्यानंतर बसचा समोरचा भाग हा पुर्णपणे डॅमेज झाला आहे. (हेही वाचा -North India Rain Updates: उत्तर भारतात पावसाचा कहर; 19 जणांचा मृत्यू, शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर)
अनेक प्रवासी वाहून गेले असून मृतदेह बाहेर काढण्यासाठी गोताखोरांना तैनात करण्यात आले आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, वेगवान बस मनमपिटिया येथील कोटालिया पुलावर आदळली आणि नदीत पडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना पोलोनारुवा रुग्णालयात नेण्यात आले आहे. आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. शवविच्छेदनासाठी रूग्णालयात नेण्यात आले आहे. अपघाताचे कारण निष्काळजीपणे वाहन चालवणे असल्याचे मानले जात आहे.