Sex करण्यासाठी केवळ 22 रुपयांत मिळतात टीनेजर मुली; पोटाची भूक घेतीय मानवतेचा बळी
एका वर्षात आता अंगोला इथे अन्नाचे दर कैक पटींनी वाढले आहेत. काही ठिकाणी हे दर दुप्पट झाले आहेत.
पोटाची खळगी भरण्यासाठी कोवळ्या वयातच मुलींना चक्क आपल्या शरीराची विक्री करावी लागत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. गरीब घरातील मुली इथे केवळ 20 ते 22 रुपयांमध्ये तर, त्यातल्या त्यात जरा बऱ्यापैकी स्थिती असलेल्या कुटुंबातील मुली 70 ते 80 रुपयांमध्ये सेक्स (Sex) करण्यासाठी उपलब्ध असतात. रॉयटर्स नावाच्या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले असून, दक्षिण अफ्रीका (South Africa) देशातील अनेक प्रदेशांमध्ये अशी स्थिती असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. पोट भरण्यासाठी देहविक्री (Prostitution) करण्याची वेळ तरुणींवर आल्याचे पाहून, पोटाची भूक मानवतेचा बळी घेत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे.
यूनायटेड नेशन्सने म्हटले आहे की दक्षिण अफ्रिकामध्ये तब्बल 4.5 कोटी लोक अन्नाच्या समस्येने ग्रासले आहेत. भूक हा येथील लोकांचा संघर्षाचे प्रमुख कारण ठरले आहे. दुष्काळ, महापूर आणि आर्थिक विपन्नावस्था ही इथल्या नागरिकांच्या गरीबी आणि दयनीयतेत अधिक भर घालत आहे. वर्ल्ड व्हिजनने म्हटले आहे की, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पाहिले आहे की, अंगोला आणि जिम्बाव्बे येथे देहविक्री करणाऱ्या महिला आणि तरुणींच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. इथे बालविवाहाचा धोकाही कैक पटींनी वाढला आहे. दरम्यान, रॉयटरने दिलेल्या वृत्तानंत या विषयाची जगभरात चर्चा सुरु झाली आहे.
अंगोला येथे वर्ल्ड व्हिजनचे इमरजन्सीज डायरेक्टर रॉबर्ड बुल्टन यांनी म्हटले आहे की, होऊ शकते की, इथे एक मुलगी सेक्स करण्यासाठई 72 रुपये (स्थानिक चलनानुसार 500 क्वान्जा) घेत असेल किंवा तिला 29 रुपये (200 क्वान्जा) इतके पैसेही मिळू शकत असतील. एका वर्षात आता अंगोला इथे अन्नाचे दर कैक पटींनी वाढले आहेत. काही ठिकाणी हे दर दुप्पट झाले आहेत. या पुढचे पीक जूनपूर्वी येमार नाही. त्यामुळे ही हालत अधिकच गंभीर आणि वाईट होईल. (हेही वाचा, बायकोने अपहरण करुन नवऱ्याच्या प्रेयसीच्या गुप्तांगात भरली चटणी, बनवला VIDEO)
जिम्बाब्वेच्या मुद्द्यावरुन केयर इंटरनॅशनल संस्थेने म्हटले आहे की, 14 वर्षांच्या मुलीही देहव्यापार करत आहेत. संस्थेचे रिजनल जेंडर एक्सपर्ट एवरजॉय महुकू यांनी म्हटले आहे की, या मुलींना देहविक्रीपोटी केवळ 22 रुपयेच मिळतात. अॅक्शन अॅडचे रिजनल एडवायजर चिकोन्डी चबवुता यांनी म्हटले आहे की, मलावी आणि मोजाम्बिक येथेही तरुणी आणि महिलांना जबरदस्तीने देहव्यापार करावा लागत आहे. अफ्रीका येथील काही भागांमध्ये 1981 नंतर पहिल्यांदाच सर्वात कमी पाऊस पडला आहे. यूनायटेड नेशन्सने असे म्हटले आहे की, पाऊस कमी पडण्यामागे पर्यावरणीय बदल हे प्रमुख कारण असावे. जाम्बिया, मडागासकर, नामिबिया, लेसोथो आणि अस्वातिनी यांसारखे अफ्रीकी देशांवर पाऊस न पडल्याने मोठा परिणाम झाला आहे.