Bangladesh: बांगलादेशमध्ये हिंसाचार; आंदोलकांकडून पोलीस चौकीवर हल्ला, जाळपोळीचीही घटना

आंदोलकांकडून तेथील पोलिस स्टेशनची जाळपोळ करण्यात आली आहे. चितगावमधील किमान सहा पोलीस ठाण्यांवर हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यांची तोडफोड करण्यात आली.

Photo Credit- X

Bangladesh: बांगलादेशमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थीती निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत तेथे 100 हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. तर असंख्य लोक जखमी झाले आहेत. आंदोलकांकडून तेथील पोलिस स्टेशनची जाळपोळ करण्यात आली आहे. चितगावमधील किमान सहा पोलीस ठाण्यांवर हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यांची तोडफोड(Police Stations Vandalize) करण्यात आली. त्यांची जाळपोळ झाली. पोलिस ठाण्यातील शस्त्रे, गोळ्या आणि विविध साहित्यांची लुटमार करण्यात आली. त्याबाबतची माहिती ढाका ट्रिब्यूनने दिली आहे. चितगाव मेट्रोपॉलिटन पोलिस (सीएमपी) अंतर्गत चंदगाव, पतेंगा, ईपीझेड, कोतोवाली, अकबर शाह आणि पहारताली येथील पोलीस ठाण्यांवर हल्ले करण्यात आली आहे. या हल्ल्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.(हेही वाचा:Bangladesh Crisis: बांगलादेशची धुरा सांभाळा; नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद यूनुस यांना आंदोलक विद्यार्थ्यांचे साकडे)

सोमवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास, हल्लेखोरांनी दमपारा येथील चितगाव मेट्रोपॉलिटन पोलिस लाइन्सच्या मुख्य गेटचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी हल्लेखोरांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि रबराच्या गोळ्या झाडल्या. त्यानंतर शेकडो लोक दाम्परा पोलिस लाइन्सच्या मुख्य गेटसमोर जमले. त्यांनी जबरदस्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जमावाला तेथून जाण्यास सांगितले. मात्र, संतप्त जमावाने पोलिस आयुक्त कार्यालयावर विटांचा मारा केला. (हेही वाचा: )

दुसऱ्या एका घटनेत लालदिघी भागातील चितगाव मध्यवर्ती कारागृहावर हल्ला झाला. कारागृहाच्या रक्षकांनी हल्लेखोरांना पांगवण्यासाठी आतून गोळीबार केला. सायंकाळी ५ च्या सुमारास हलिशहरच्या छोटापुल भागातील चितगाव जिल्हा पोलीस लाइन्सलाही लक्ष्य करण्यात आले. दरम्यान, सरकार पडल्याच्या वृत्तानंतर चितगाव सिटी कॉर्पोरेशनचे महापौर एम रजाउल करीम चौधरी यांच्या निवासस्थानाला लक्ष्य करण्यात आले. तेथेही आग लावल्याच्या घटना घडल्या. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, जुबो लीगचे नेते हेलाल अकबर बाबर यांच्या घरावरही हल्ला करण्यात आला.