Layoffs After Silicon Valley Bank Collapse: सिलिकॉन व्हॅली बँक कोसळल्याने 10,000 स्टार्टप्स बंद होण्याच्या मार्गावर, 1,00,000 नोकऱ्यांवर गदा
सिलिकॉन व्हॅलीचे दिवाळे वाजण्यामुळे विविक्ष क्षेत्रातील सुमारे 1,00,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या (Layoffs After Silicon Valley Bank Collapse) धोक्यात येऊ शकतात.
सिलिकॉन व्हॅली बँक (Silicon Valley Bank) आर्थिक गर्तेत सापडून ती पूरती बुडाल्यामुळे जगभरातील अनेक नवउद्यमी म्हणजेच न्यू स्टार्टप्सना फटका बसण्याची चिन्हे आहेत. त्यांची संख्या सुमारे 10,000 च्या घरात आहे. त्यासोबतच सिलिकॉन व्हॅलीचे दिवाळे वाजण्यामुळे विविक्ष क्षेत्रातील सुमारे 1,00,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या (Layoffs After Silicon Valley Bank Collapse) धोक्यात येऊ शकतात असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहेत. यात भारतातील सुमारे 200 स्टार्टप्सचा समावेश आहे. यातील बहुतांशी स्टार्टप्स सॉफ्टवेअर सेवा पुरवठा क्षेत्रातील आहेत. जे अमेरिका किंवा विदेशातील सॉप्टवेअर कंपन्यांना सेवा पुरवतात. धक्कादायक असे की, सिलीकॉन व्हॅली ही 2008 मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक आरिष्ठानंतर बुडालेली सर्वात मोठी बँक आहे.
दरम्यान, सांगितले जात आहे की, जगभरातील अनेक नवउद्योजकांनी एसव्हीबीमध्ये खाते उघडले आहे. या खात्यांमध्ये प्रत्येकी अडीच लाख डॉलरपेक्षाही अधिक मोठ्या रकमेच्या ठेवी अथवा गुंतवणुकी आहेत. चिंताजनक बाब अशी की ही रक्कम बँक बंद करण्याबाबत आदेश देणाऱ्या अमेरिकी नियमामकांनी (यूएस रेग्युलेटर) सरंक्षण निश्चिती केलेल्या रकमेपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. परिणामी एसव्हीबीचे दिवाळे वाजताना या नवउद्योजकांनाही जोराचा फटका बसला आहे. (हेही वाचा, Silicon Valley Bank Shut Down: भारतावर काय होणार परिणाम? घ्या जाणून)
सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) ही एक व्यावसायिक बँक आहे जी तंत्रज्ञान, जीवन विज्ञान आणि उद्यम भांडवल उद्योगांना आर्थिक सेवा प्रदान करते. 1983 मध्ये स्थापन झालेली आणि सांता क्लारा, कॅलिफोर्निया येथे मुख्यालय असलेली, SVB ही तंत्रज्ञान फायनान्सच्या जगातील सर्वात प्रमुख बँकांपैकी एक बनली आहे.
सिलिकॉन व्हॅली बँक काय काम करते?
SVB आपल्या ग्राहकांना बँकिंग आणि क्रेडिट सेवा, गुंतवणूक व्यवस्थापन आणि सल्लागार सेवांसह विविध प्रकारच्या वित्तीय सेवा ऑफर करते. बँक विशेषत: तिच्या कर्ज सेवांसाठी प्रसिद्ध आहे, जे सुरुवातीच्या टप्प्यात आणि विकास-स्टेज तंत्रज्ञान आणि जीवन विज्ञान कंपन्यांसाठी मदतगार ठरते.