Shocking! लिंग कापून प्रियकराची हत्या, त्याच्या मित्राचाही केला गेम; प्रेयसीचे थरारक कृत्य, 'डबल मर्डर' केसमध्ये कोर्टात हजर
यावेळी, एव्हरलेच्या वकिलाने 19 सप्टेंबर रोजी तिच्या पुढील न्यायालयाच्या तारखेपूर्वी तिचा मानसोपचार अहवाल तयार करण्याची विनंती केली. हेराल्ड सनच्या वृत्तानुसार, एव्हरले रुग्णालयातून न्यायालयात हजर झाली होती.
ऑस्ट्रेलियातील (Australia) मेलबर्नमध्ये (Melbourne) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्राची चाकूने वार करून हत्या केली. ती महिला एवढ्यावरच थांबली नाही, तर प्रियकरावर चाकूने हल्ला केल्यानंतर तिने त्याचे लिंग कापून फेकून दिले. रिपोर्टनुसार, जॅस्मिन एव्हरली (Jasmine Everleigh-44) आणि समीर एस्बेक (Samir Esbeck-59) यांचे 10 वर्षांपासून संबंध होते. 4 मुलांची आई असलेल्या जस्मिनवर समीर आणि त्याचा मित्र सार्किस अबौद (Sarkis Abboud-61) यांची चाकूने भोसकून हत्या केल्याचा आरोप आहे.
मेलबर्नच्या ब्रन्सविकमध्ये 5 मे रोजी ही घटना घडली. एस्बेकचा त्याच्या अपार्टमेंटमध्ये जागीच मृत्यू झाला, तर अबौदला हॉस्पिटलमध्ये जाताना जीव गमवावा लागला. आता आज या महिलेला कोर्टात हजर करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला ट्राममधून अटक केली होती. ट्राममध्ये एक महिला असून तिच्या अंगावर रक्त आणि हातावर जखमा झाल्याची माहिती लोकांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले.
महिलेच्या अंगावरील जखमांमधून रक्तस्त्राव होत होता, तसेच तिचे कपडे रक्ताने माखले असल्याचे सहायक आयुक्त मिक फ्रीव्हन यांनी सांगितले. अटक करण्यापूर्वी तिला रुग्णालयात नेण्यात आले आणि तिच्यावर उपचार केल्यानंतर तिची चौकशी करण्यात आली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते अपार्टमेंट पूर्णपणे सील केले आहे. जवळचा एक स्ट्रिप क्लबही बंद करण्यात आला आहे. पोलिसांचा असा विश्वास आहे की एव्हरली आणि एसबॅक एकाच अपार्टमेंटमध्ये एकत्र राहत होते. (हेही वाचा: Honeymoon: हनीमूनवर असताना वेश्येशी संपर्क, संसाराच्या सुरुवातीलाच पतीस बेड्या)
सोमवारी याबाबत न्यायालयीन सुनावणी पार पडली. यावेळी, एव्हरलेच्या वकिलाने 19 सप्टेंबर रोजी तिच्या पुढील न्यायालयाच्या तारखेपूर्वी तिचा मानसोपचार अहवाल तयार करण्याची विनंती केली. हेराल्ड सनच्या वृत्तानुसार, एव्हरले रुग्णालयातून न्यायालयात हजर झाली होती. तिच्या वकिलाने सांगितले की, ‘केसला मदत करू शकेल अशी काही महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी’ केस पुढे ढकलली जात आहे.