Shocking! ब्रेकअपनंतर सूडाने पेटून उठली महिला; माजी प्रियकराला मारण्यासाठी दिली 3 जणांना सुपारी, तरुणाचा मृत्यू 

इसाबेलने त्यांना लिएंड्रोला मारहाण करण्याबरोबरच, त्याचे घर लुटू शकतात असेही सांगितले होते. शवविच्छेदनामध्ये लिएंड्रोचा मृत्यू गळा आवळल्याने व त्यामुळे गुदमरून झाल्याचा निष्कर्ष समोर आला आहे.

ब्रेकअप (प्रातिनिधिक-संग्रहित-संपादित प्रतिमा)

अनेकांसाठी ब्रेकअप (Breakup) ही आयुष्यातील सर्वात कठीण आणि दुःखदायक घटना असते. या फेजमध्ये मन थाऱ्यावर नसते व त्यामुळे या काळात घेतलेले काही निर्णय चुकीचे ठरू शकतात व त्याचा इतरांनाही त्रास होऊ शकतो. ‘ब्रेकअप’ हाताळण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, काहीजण स्वतःला दोष देतात तर काहीजण बदला घेण्याच्या विचाराने पेटून उठतात. आता एका इन्फ्लुएंसर महिलेने ब्रेकअप नंतर बदला म्हणून माजी प्रियकराचा गळा घोटण्यासाठी काही लोकांना सुपारी दिल्याची घटना समोर आली आहे.

इसाबेला गोम्स परेराI (Isabela Gomes Pereira) असे या महिलेचे नाव असून ती 28 वर्षांची आहे. कॉन्टेजेम, ब्राझील इथे ही घटना घडली. इसाबेलाने आपला माजी प्रियकर लिएंड्रो रेझेंडेच्या (Leandro Rezende) घरात घुसून त्याला मारण्यासाठी तीन जणांना सुपारी दिली होती. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जूनमध्ये ही घटना घडली. यामध्ये काही लोकांनी 36 वर्षीय लिएंड्रोच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला केला व त्याला विजेच्या तारांनी बांधण्यात आले.

त्यानंतर टोळीच्या सदस्यांनी त्याला लाथा मारून मारहाण केली व पंख्याच्या ताराने त्याचा गळा आवळून खून केला. पोलिसांचा असा विश्वास आहे की, गोम्सचा फक्त तिच्या माजी प्रियकराला घाबरवण्याचा आणि जखमी करण्याचा हेतू होता, परंतु प्रकरण खूप पुढे गेले व त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. आता इसाबेला आणि कथित टोळीतील दोन सदस्यांवर हिंसेसह लुटमारीचा आरोप आहे. टोळीतील तिसरा संशयित सदस्य अद्याप फरार आहे. (हेही वाचा: Canada: 'जोडीदाराच्या संमतीशिवाय Condom काढणे हा लैंगिक गुन्हा'; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय)

हे तीन जण अनुक्रमे 20, 24 आणि 31 वर्षांचे आहेत. इसाबेलने त्यांना लिएंड्रोला  मारहाण करण्याबरोबरच, त्याचे घर लुटू शकतात असेही सांगितले होते. शवविच्छेदनामध्ये लिएंड्रोचा मृत्यू गळा आवळल्याने व त्यामुळे गुदमरून झाल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. लिएंड्रोच्या घरातील काही महागड्या वस्तूही गायब असल्याचे समोर आले आहे. स्थानिक माध्यमांनी सांगितले की या जोडप्याला हिंसाचाराचा इतिहास आहे. सध्या लिओनार्डोच्या मृत्यूची चौकशी सुरू आहे. गोम्सचे सोशल मीडियावर 11,000 फॉलोअर्स असून ती त्यावर सौंदर्यप्रसाधनांची विक्री करते.