Shocking! उडत्या विमानात चक्क मांजरीला 'स्तनपान' करू लागली महिला; प्रवाशांनी केली तक्रार, जाणून घ्या काय घडले पुढे...
मेसेजमध्ये लिहिले होते – ‘सीट 13A वर बसलेली महिला तिच्या मांजरीला स्तनापात करत आहे आणि असे करण्यापासून तिला अडवण्यात येऊनही ती थांबत नाहीये.’
पाळीव प्राण्यांना (Pet Animals) घरातीलच एक सदस्य समजणारे अनेक कुटुंब आपण पाहिली असतील. काही लोकांचा आपल्या पाळीव प्राण्यांवर इतका जीव असतो की ते आपल्या पेट्ससाठी काहीही करण्यास तयार होतात. असेच एक प्रकरण अमेरिकेमधून समोर आले आहे. आपल्या पेट्सवरील प्रेमाखातर एका महिलेने विमानात असे काही केले की ज्याचा कोणी विचार केला नसेल किंवा पाहिले नसेल. या महिलेने उडत्या विमानात आपल्या पाळीव मांजरीला स्तनपान (Breastfeeding) करण्यास सुरुवात केली, जे पाहून सगळेच थक्क झाले.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, डेल्टा एअरच्या फ्लाइट DL1360 मध्ये Syracuse ते Atlanta प्रवासादरम्यान एक महिला आपल्या पाळीव मांजरीला स्तनपान करू लागली. हा प्रकार आजूबाजूला बसलेल्या लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. लोकांनी तत्काळ केबिन क्रूला याबाबत माहिती दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी महिलेला असे करण्यापासून रोखले परंतु तिने त्यांचे ऐकले नाही. (हेही वाचा: कोरोना संसर्गावर Chewing Gum ठरणार प्रभावी; 95% परिणामकारक असल्याचा दावा)
त्यानंतर एअरक्राफ्ट कम्युनिकेशन्स अॅड्रेसिंग अँड रिपोर्टिंग सिस्टीमने लगेच मुख्यालयाला संदेश पाठवला. मेसेजमध्ये लिहिले होते – ‘सीट 13A वर बसलेली महिला तिच्या मांजरीला स्तनापात करत आहे आणि असे करण्यापासून तिला अडवण्यात येऊनही ती थांबत नाहीये.’ हा मेसेज ट्विटरवर शेअर करण्यात आला, जो पाहून लोकही चक्रावून गेले. या महिलेचा हा विचित्र कारनामा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही जणांनी या महिलेचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे म्हटले आहे, तर काही लोकांनी या महिलेचे कौतुक केले आहे.
दरम्यान, अमेरिकेत प्राण्यांच्या विमान प्रवासाची अनेक विचित्र प्रकरणे समोर आली असून, त्यानंतर कायदे कडक करण्यात आले आहेत. जवळजवळ सर्व प्रकरणांमध्ये अशा प्राण्यांबद्दल तक्रारी आल्या होत्या. पण पहिल्यांदाच असा प्रकार समोर आला आहे. माहितीनुसार, डेल्टा फ्लाइटमध्ये लहान कुत्री आणि मांजरे प्रवास करू शकतात, परंतु संपूर्ण प्रवासादरम्यान त्यांना पुढील सीटखाली कॅरियरमध्ये ठेवले जाते.