IPL Auction 2025 Live

Bangladesh Protests: पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीत आल्या शेख हसीना; आता लंडनला जाणार

आता त्या आगरतळाहून नवी दिल्लीला आल्या असून पुढे त्या लंडनला जाणारे विमान पकडणार आहे.

Sheikh Hasina (PC - Instagram)

Bangladesh Protests: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी आज हिंसक निषेधानंतर राजीनामा दिला. मीडिया रिपोर्टनुसार, शेख हसीना ढाकाहून आगरतळा (Agartala) येथे आल्याचे सांगण्यात येत आहे. आता त्या आगरतळाहून नवी दिल्लीला (New Delhi) आल्या असून पुढे त्या लंडन (London)ला जाणारे विमान पकडणार आहे. बांगलादेशातून पळून गेल्यानंतर शेख हसीना भारतातही आश्रय घेऊ शकल्या असत्या. पण त्यासाठी त्यांनी लंडनची निवड का केली? यामागे काय कारण असू शकते? मात्र, लंडनमध्येही त्यांचा तात्पुरता मुक्काम असेल की तेथे त्यांना राजकीय आश्रय मिळेल का? असे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.

बांगलादेशच्या पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर एएनआयला वृत्तसंस्थेला सांगितले की, हिंसा भडकल्यानंतर त्यांनी ढाका येथील अधिकृत निवासस्थान सोडले आहे. त्यांचा सध्याचा ठावठिकाणा अज्ञात आहे. ढाक्यातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाला जमावाने वेढा घातला आहे. (हेही वाचा -Bangladesh PM Sheikh Hasina Resigned: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचा राजीनामा, देशही सोडला; मीडियाचा सूत्रांच्या हवाल्याने दावा)

दरम्यान, शेख हसीना यांनी दुपारी 12 वाजता राष्ट्रपती शहाबुद्दीन अहमद यांच्याकडे राजीनामा पत्र सुपूर्द केले. बांगलादेशची राजधानी ढाका येथे लाखो लोकांनी आधीच विजयी पदयात्रा सुरू केली. तथापी, कोणताही मंत्री पळून जाऊ नये म्हणून ढाका विमानतळ सील करण्यात आले आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना सोमवारी दुपारी 2:30 वाजता बंगभवन येथून लष्करी हेलिकॉप्टरने त्यांची धाकटी बहीण शेख रेहाना यांच्यासोबत सुरक्षित स्थळी गेल्या, असे स्थानिक माध्यमांनी वृत्त दिलं आहे. (हेही वाचा: Bangladesh Violence: बांगलादेशात पुन्हा तणाव वाढला, विद्यार्थी नेत्यांनी पंतप्रधान शेख हसीना यांचे चर्चेचे निमंत्रण नाकारले)

शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशचे लष्करप्रमुख वकर-उझ-जमान यांनी ढाका येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. देश चालवण्यासाठी लवकरच अंतरिम सरकार स्थापन केले जाईल. लष्कराशी झालेल्या चर्चेत प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शांत राहून घरी परत जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (हेही वाचा, Bangladesh Protests: बांगलादेशमध्ये हिंसाचारात 72 जणांचा मृत्यू, असंख्य जखमी; सरकारकडून अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू(Watch Video))

दरम्यान, आंदोलक आणि सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांमध्ये उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 14 पोलिसांसह सुमारे 300 जणांना जीव गमवावा लागला आहे. या हिंसाचारात हजारो लोक जखमी झाले आहेत. बांगलादेशातील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की संपूर्ण देशात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.