Sex with Corpses: व्यक्तीने 100 हून अधिक मृतदेहांसोबत केला सेक्स; रुग्णालयात प्रशासनाच्या नाकाखाली घडला प्रकार, जाणून घ्या सविस्तर

हत्येच्या दोन गुन्ह्यांमध्ये तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. याव्यतिरिक्त, तो नेक्रोफिलियाच्या त्याच्या असंख्य उदाहरणांसाठी एकाच वेळी 12-वर्षांचा तुरुंगवासही भोगत आहे.

Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

यूकेमधून (UK) मृतदेहासोबत लैंगिक संबंधांचे (Sex with Corpses) एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. डेव्हिड फुलर नावाच्या व्यक्तीने विविध रुग्णालयांत 100 हून अधिक मृतदेहांसह सेक्स केला आहे. याबाबत सरकारने चौकशीचे आदेश दिले होते, ज्यामध्ये रुग्णालयांचे मोठे अपयश उघड झाले आहे. वास्तविक मृतदेहासोबत सेक्स हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये पीडित व्यक्तीला मृत शरीरासोबत संभोग करण्यात आनंद मिळतो. या आजाराला ‘नेक्रोफिलिया’ म्हणतात. फुलर हा 'नेक्रोफिलिया' या आजाराने ग्रस्त होता व ही बाब 2020 मध्ये उघड झाली. त्यावेळी पोलीस 1987 मध्ये दोन महिलांच्या हत्येशी प्रकरणाचा तपास करत होते.

या तपासामध्ये डेव्हिडच्या भूमिकेची चौकशी सुरू झाली आणि त्याचा डीएनए नमुना घेण्यात आला. यावेळी तो 'नेक्रोफिलिया' या आजाराने ग्रासल्याचे आढळून आले. त्यानंतर तपास अधिकाऱ्यांना डेव्हिडच्या घरातून अशी लाखो छायाचित्रे सापडली, ज्यामध्ये तो महिलांचे लैंगिक शोषण करताना दिसत होता. यामध्ये एका व्हिडिओचाही समावेश होता, ज्यामध्ये तो शवागारात महिला आणि मुलींसोबत सेक्स करताना दिसत होता. ही छायाचित्रे आग्नेय इंग्लंडमधील रुग्णालयांतील शवागारांची होती. या रुग्णालयांमध्ये डेव्हिड काम करायचा.

पोलिसांच्या पुढील चौकशीमध्ये डेव्हिडवरील आरोप सिद्ध झाले आणि त्याला या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले. यासह 1987 मध्ये ससेक्स हॉस्पिटलमध्ये त्यानेच दोन महिलांची हत्या केल्याचे आढळून आले. डेव्हिड फुलर सध्या 69 वर्षांचा आहे. हत्येच्या दोन गुन्ह्यांमध्ये तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. याव्यतिरिक्त, तो नेक्रोफिलियाच्या त्याच्या असंख्य उदाहरणांसाठी एकाच वेळी 12-वर्षांचा तुरुंगवासही भोगत आहे.

हे प्रकरण समोर आल्यानंतर एवढ्या प्रदीर्घ कालावधीसाठी कोणालाही मागमूस न लागू देता फुलरने हे गुन्हे कसे केले आणि भविष्यात असे गैरवर्तन होऊ नयेत यासाठी सरकारने चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीमधून रुग्णालयाचे मोठे अपयश समोर आले आहे. या चौकशीद्वारे रुग्णालयांचे व्यवस्थापन, प्रशासन, नियमन आणि प्रक्रियेतील कारभाराचा ढिसाळपणा दिसून येतो, ज्यामुळे डेव्हिड ही घृणास्पद कृत्ये करण्यास परवानगी मिळाली. (हेही वाचा: Nude Photos in Boyfriends Phone: महिलेला आपल्या बॉयफ्रेंडच्या फोनमध्ये आढळले 13,000 मुलींचे नग्न फोटो; तक्रार दाखल, तपास सुरु)

फुलर हा सुरुवातीपासूनच कुख्यात चोर होता, मात्र आपल्या कामाच्या ठिकाणी त्याने आपला गुन्हेगारी रेकॉर्ड लपवला होता. ब्रिटीश सरकारला त्याच्या तपासात असे आढळून आले आहे की, फुलरने 2005 ते 2020 दरम्यान म्हणजे जवळपास 15 वर्षांमध्ये किमान 101 मुली आणि महिलांच्या मृतदेहांसोबत घृणास्पद कृत्ये केली. ब्रिटनच्या तपास यंत्रणेने पुरावा म्हणून सर्व गुन्ह्यांची छायाचित्रे आणि व्हिडिओही सादर केले आहेत.