Sex Through Dating App: डेटिंग अॅपद्वारे अल्पवयीन मुलीला लैंगिक संबंधासाठी प्रलोभन; भारतीय वंषाच्या पुरुषावर  US federal Prosecuto द्वारे आरोप

Dating App | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

यूट्यूबवरील स्टिंग ऑपरेशनमध्ये कथितरित्या पकडलेल्या भारतीय वंशाच्या पुरुषावर अमेरिकेच्या फेडरलने (US federal Prosecuto) डेटिंग अॅपद्वारे (Dating App) अल्पवयीन मुलीला सेक्ससाठी प्रलोभन देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावला आहे. आनंद सिंग असे या व्यक्तीचे नाव असल्याचे समजते. वृत्तसंस्थ आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण न्यूयॉर्कचे फेडरल वकील डॅमियन विल्यम्स यांनी सोमवारी सांगितले की, आनंद सिंगने कथितपणे डेटिंग आणि मजकूर अॅप्सद्वारे लैंगिक (Sex Through a Dating App) हेतूंसाठी भेटण्यासाठी 14 वर्षांच्या व्यक्तीला फसवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, या प्रकरणातत एका व्यक्तीला अटक झाल्याचे वृत्त आहे. वकील डॅमियन विल्यम्स यांनी सांगितले की, या प्रकरणात झालेली आजची अटक ही आमच्या तरुणांना इंटरनेट संदर्बातील संभाव्य धोक्याची आठवण करून देणारी आहे. तसेच त्यांना ऑनलाइन भक्षकांपासून वाचवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचेही ते पुढे म्हणाले.

न्यायालयाच्या दस्तऐवजावरून पुढे येते की, स्टिंग ऑपरेशन गैर-अधिकार्‍यांनी आयोजित केले होते. ज्यांनी परस्परसंवाद रेकॉर्ड केला आणि फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) ला माहिती देत YouTube वर अपलोड केले.

फिर्यादी कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, उपनगरीय काउंटीच्या स्थानिक विधानसभेसाठी काम करणारे सिंग, गेल्या डिसेंबरमध्ये न्यू जर्सीमधील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये 14 वर्षांच्या मुलीच्या रूपात उभे असलेल्या व्यक्तीला भेटण्यासाठी गेले होते. त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीनुसार, “हिली” नावाच्या डेटिंग अॅपवर, त्याने कथितपणे वारंवार ग्राफिक आणि अस्पष्ट शब्दांत लैंगिक संबंधाची भावना व्यक्त केली. व्यक्तीसोबत लैंगिक कृती करण्याची इच्छा व्यक्त केली आणि तिला भेटण्याची योजना बनवली.

ट्विट

मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांचा तपास करणार्‍या एफबीआयच्या विशेष एजंट एरिका बुनोकोरने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या महिन्यात तिला “आनंद” नावाची एक व्यक्ती आणि दुसरी 14 वर्षांची मुलगी म्हणून संवाद केल्याबद्दल युट्यूब व्हिडिओवर अलर्ट करण्यात आला होता. ज्याला न्यायालयाच्या दस्तऐवजात केवळ 'रिपोर्टर-1' म्हणून ओळखले जाते.

बुओनोकोर यांनी सांगितले की, त्यांनी 'रिपोर्टर-2' म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्यक्तीची मुलाखत घेतली ज्याने यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केला. सिंग आणि “रिपोर्टर-१” तसेच फोन आणि “हिली” खात्यावरुन संवादात सहभाग प्रवेश मिळवला आणि सतत त्यावर पाळत ठेवली. सिंग यांनी या प्रकरणात “रिपोर्टर-1” सोबत संवाद साधण्यासाठी वापरलेली भाषा अश्लील आहे. ज्यातून 14 वर्षीय मुलीला लैंगिक संबंधांबाबत अप्रत्यक्षरित्या सूचवले अथवा मागणी केली जात आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now