यहूदी महिलांचा Sex Strike; ज्यू धर्मातील पारंपरीक कायद्यास अमेरिकेत विरोध; घ्या जाणून
हे आंदोलन म्हणजे एक लैंगिक छळाविरुद्धची चळवळ (Hasidic Women's Sex Strike) आहे. अनेकांनी या आंदोलनाला 'सेक्स स्ट्राईक' असेही म्हटले आहे.
Sex Strike in US: अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरामध्ये महिलांनी अनोखे आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन म्हणजे एक लैंगिक छळाविरुद्धची चळवळ (Hasidic Women's Sex Strike) आहे. अनेकांनी या आंदोलनाला 'सेक्स स्ट्राईक' असेही म्हटले आहे. या आंदोलनात सहभागी असलेल्या बहुतांश महिला ज्यू म्हणजे यहूदी समूदयातील आहेत. आपल्या धर्मात अपमानास्पद असलेला कायदा रद्द करावा यासाठी या महिलांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
महिलांचा दावा आहे की, हा कायदा या समूदयातील महिलांना लग्नाच्या जोखडात जबरदस्तीने अडकवतो. इतकेच नव्हे तर काही कारणांमुळे जोडीदारापासून म्हणजेच पतीपासून घटस्फोटघ्यायचा असेल तर त्यामध्ये हा कायदा मोठा अडथळा उभा करतो. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी या आंदोलनाबाबत दिलेल्या वृत्तानुसार, या धर्मातील हा कायदा एखाद्या महिलेस पतीपासून घटस्फोट मागत असेल तर त्यासाठी सदर महिलेला तिच्या पतीची लेखी परवानगी घेणे बंधनकारक खरतो. पारंपरीक जोखडातून बाहेर पडू पाहणाऱ्या आणि वैवाहीक आयुष्यातून बाहेर पडत स्वत:चा आत्मशोध घेऊ पाहणाऱ्या महिलांनी या काद्याला तीव्र विरोध करत ही मोहीम हाती घेतली आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या महिलांनी आंदोलनाचा भाग म्हणून आपल्या पतीशी जवळीक रोखून धरली आहे. त्या आपल्या पतीच्या लैंगिक भावनांना शांततेच्या मार्गाने विरोध करत आहेत. तसेच, त्यांना शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत आहेत. महिलांच्या या अनोख्या आंदोलनामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. महिला आपले आंदोलन शांततेच्या मार्गाने करत असूनही त्यांना सोशल मीडियावर तीव्र टीकेचा सामना करावा लागतो आहे.शिवाय काही ठिकाणी महिलांवर शारीरिक हल्ला झाल्याचाही घटना काही प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत. आंदोलनाला विरोध करताना विरोधकांनी महिलांवर अंडी फेकून निषेध नोंदवल्याचे वृत्त आहे.
घटस्फोट देणे हा पतीचा अधिकार नाही. तो मंजूर करण्यासाठी धर्मानुसार आणि कायद्यानुसार विशिष्ट प्रक्रिया असते. पण, महिलेला जर तिच्या पतीपासून घटस्फोट हवा असेल तर तिच्या पतीची लेखी परवानगी घ्यावी लागते. एखादा पती जर त्याच्या पत्नीचा द्वेश करत असेल किंवा तिला जाणिवपूर्वक त्रास द्यायच्या उद्देशाने तो तिला परवानगी नाकारु शकतो. परिणामी तिला आयुष्यभर त्याच्यासोबत मन मारुन राहावे लागेल. तसेच, पीडित महिलेला नवे आयुष्य निर्माण करु शकत नाही.
एक्स पोस्ट
माल्की बर्कोविट्झ नावाची 29 वर्षीय महिला या आंदोलनाच्या अग्रभागी आहे. ती तिचा पती व्हॉल्वी याच्यापासून सन 2020 पासून विभक्त राहते आहे. मात्र, असे असूनही तिला केवळ पतीची लेखी परवानगी नाही म्हणून घटस्फोट मिळत नाही. परिणामी तिला तिचे नवे आयुष्य सुरु करता येत नाही. या महिलेने सुरु केलेल्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो आहे.