Sex Slave मुली मेसेजिंग अॅपद्वारे ऑनलाईन ब्लॅकमेल, चॅट ग्रुपमध्ये 2.5 लाख सदस्यांचा समावेश

या मुली ग्रुप अॅडमीन किंवा ग्रुपमधील सदस्याच्या हुकुमावरुन आफले न्यूड पिक्चर्स पाठवत असत. आता धक्कादायक वास्तव पुढे आले आहे की, या फोटोंच्या माध्यमातूनच या मुलींना अॅडमीन आणि त्या ग्रुपमधीलच काही जणांकडून ब्लॅकमेल केले जात आहे.

Sex Slave | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

सेक्स फँटसी पूर्ण करण्यासाठी अनेक लोक अनेकदा इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन जोडीदार शोधत असतात. अशा वेळी जर काळजी घेतली नाही तर भलताच धोका मिळू शकतो. साउथ कोरिया (South Korea) देशातील एक मोठे ऑनलाईन सेक्स स्कँडल (Sex Scandal) उघडकीस आले आणि या धक्कादायक प्रकाराचा उलघडा झाला. एका अज्ञात व्यक्तीने मसेजिंग अॅप (messaging app) माध्यमातून एक चॅट ग्रुप (Chat group) तयार केला होता. या ग्रुपमध्ये सुमारे दोन डझनहून अधिक मुली सहभागी होत्या. याती बहुतांश मुली सेक्स स्लेव म्हणजेच सेक्स गुलाम होत्या. या मुली ग्रुप अॅडमीन किंवा ग्रुपमधील सदस्याच्या हुकुमावरुन आफले न्यूड पिक्चर्स पाठवत असत. आता धक्कादायक वास्तव पुढे आले आहे की, या फोटोंच्या माध्यमातूनच या मुलींना अॅडमीन आणि त्या ग्रुपमधीलच काही जणांकडून ब्लॅकमेल केले जात आहे.

सीएनएने याबाबत एक वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार 21 वर्षे वयाच्या चो जो बिन याने इंक्रिप्टेड मैसेजिंग ऐप टेलीग्राम (Telegram) च्या माध्यमातून एक ग्रुप तयार केला. हा व्यक्ती ऑनलाइन रुम होस्टिंगचा वापर करत युजर्सला आपल्या चॅट ग्रुपमध्ये सहभागी करुन घेत असे. यूजर्सला मुलींची नग्न छायाचित्रं आणि सेक्सुअल अक्टीव्हीट परफॉर्म पाहण्यास प्रवृत्त केले जात असे.

या सर्व ग्रुप आणि फसवणुकीचे भांडे फुटल्यावर सुमारे 74 मुली पीडित असल्याचे समोर आले आहे. याचा आकडा आणखीही वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी म्हटले आहे की, या ग्रुप चॅटमध्ये सुमारे 2 लाख 60 हजार सदस्य असून शकतात. तसेच, या ग्रुपमध्ये असलेल्या 16 मुली अल्पवयीन असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Sex Education: सेक्स अॅडिक्शन - वेळीच उपचार करा अन्यथा होऊ शकतं मोठ नुकसान)

आरोपी चो जो बिन याला साऊथ कोरिया पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सेक्स स्कँडलमुळे अवघ्या कोरियात खळबळ उडाली आहे. लोकांचा संताप इतका तीव्र आणि अनावर झाला आहे की, या संतापाला आवर घालण्यासाठी राष्ट्रपती मून यांना अवाहन करावे लागले आहे. राष्ट्रपती मून यांनी अश्वासन दिले आहे की, या चॅट ग्रुपमध्ये असलेल्या सर्व सदस्यांची चौकशी होईल. दरम्यान, या चॅट ग्रुपशी संबंधीत 124 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर 18 लोकांना अटक करण्यात आली आहे.

आरोपी चो जो बिन हा सोशल मीडियावर मॉडेलींग जॉब संदर्भात पोस्ट टाकत असे. त्यातून अनेक मुली त्याच्याशी संपर्क करत. काही मुली त्याच्या जाळ्यात अडकत. त्या मुली आरोपीस आपली व्यक्तिगत माहिती देत असत. ज्यात खासगी फोटो, सिक्योरिटी नंबर, नाव, पत्ता आणि इतर वैयक्तीक माहितीचा समावेश असे. पुढे या माहितीचा वापर करत चो जो बिन हा त्या मुलींना आपले विविध पोझेसमध्ये अश्लील फोटो पाठविण्यास सांगत असे. या फोटोंच्या बदल्यात त्यांना काही पैसे देण्याचेही आमीश दाखवले जात असे. एकदाका मुलगी त्याच्या जाळ्यात आली की, मग तो त्या मुलींना ब्लॅकमेल करत असे. मुलींनी विरोध केला तर हे फोटो सोशल मीडियावर आणि इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत असे. तसेच, या फोटोंसोबत तुमची व्यक्तीगत माहितीही शेअर केली जाईल असे सांगत असे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now