Sex Change Surgery: सख्ख्या बहिणी झाल्या पक्के भाऊ, सेक्स चेंज शस्त्रक्रियेने केली कमाल; पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या गुजरात जिल्ह्यातील घटना
ती काहीशी अस्पष्ट राहते. त्यामुळे त्यांचे जननेंद्रीय स्पष्ट आकार घेत नाही. त्यामुळे काही मुलांमध्ये दोन्ही प्रकारच्या लिंगाची (स्त्री, पुरुष) अस्तित्व दिसते. आशा प्रकारच्या मुलांना 'एटिपिकल जेनेटेलिया' नावाचा आजार आढळून येतो.
पाकिस्तानातील (Pakistan0 पंजाब (Punjab Province) प्रांतातील गुजरात (Gujarat District) जिल्ह्यात दोन सख्ख्या बहिणी आता सख्खे भाऊ झाले आहेत. तर वालीत आणि मुराद या उभतांना एकूण 7 मुलींपैकी दोन मुलगे झाले आहेत. होय, ही घटना वाचून काहीसा तुमचा गोंधळ नक्कीच होऊ शकतो. परंतू लिंग बदल शस्त्रक्रिया (Sex Change Surgery Of Two Sisters ) म्हणजेच सेक्स चेंज ऑपरेशन (Sex Change Surgery) केल्यामुळे ही किमया घडली आहे. डॉक्टरांनीही अशा प्रकारे सख्ख्या बहिणींचे रुपांतर सख्ख्या भावात झाल्याचे पहिल्यांदाच पाहिल्याचे म्हटले आहे.
बीबीसीने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गुजरात जिल्ह्यात असलेल्या वालीद आणि मुराद या दाम्पत्याचा 1993 मध्ये विवाह झाला. या विवाहानंतर उभयतांना एकूण 7 अपत्ये झाली. सर्वच्या सर्व अपत्ये मुलीच होत्या. परंतू, पाचव्या आणि सहाव्या म्हणजेच शेवटून पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकांच्या मुलींची अभिरुची काहीशी भिन्न होती. त्यांच्यात मुलींपेक्षा मुलांचीच लक्षणे अधिक जाणवत होती. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करणयाचा सल्ला दिला.
एबटाबाद येथील यूब टीचिंग हॉस्पिटलचे डॉक्टर जुनैद यांनी म्हटले आहे की, काही मुलांच्या लिंगाची ओळख जन्मत:च स्पष्ट नसते. ती काहीशी अस्पष्ट राहते. त्यामुळे त्यांचे जननेंद्रीय स्पष्ट आकार घेत नाही. त्यामुळे काही मुलांमध्ये दोन्ही प्रकारच्या लिंगाची (स्त्री, पुरुष) अस्तित्व दिसते. आशा प्रकारच्या मुलांना 'एटिपिकल जेनेटेलिया' नावाचा आजार आढळून येतो. हे प्रमाण सरासरीच्या तुलनेत अगदीच नगण्य असते. अशा मुलांमध्ये शस्त्रक्रिया करुन लिंगनिश्चीती करता येते. (हेही वाचा, लिंग बदल शस्त्रक्रिया करण्यास मुलाला वडीलांचा विरोध, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या)
दरम्यान, या दोन्ही बहिणींबद्दल बोलताना डॉक्टरांनी सांगितले की, विशीष्ट वय झाले तरीही या दोन्ही बहिणींना मासिक पाळी सुरु झाली नव्हती. त्यामुळे या दोन्ही मुलींची आई त्यांना घेऊन दवाखान्यात आली. तेव्हा त्यांना पीआईएमएस चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. दोन्ही बहिणींच्या तपासण्या केल्या तेव्हा डॉक्टरांच्य लक्षात आले की, त्यांना 'एटिपिकल जेनेटेलिया' नावाचा आजार आहे. त्यामुळे लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यावरुन दोन्ही बहिणींची लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यात आली. आता या दोन्ही बहिणी सख्खे भाऊ म्हणून वावरत आहेत.