Imran Khan: सौदीचे राजे प्रिन्स मुहम्मद बिन सलमान यांनी इमरान खान दिलेल्या भेटवस्तू 2 दशलक्ष डॉलर्सला विकल्या; प्रसारमाध्यमांचा दावा
पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इमरान खान यांना सौदीचे राजे मुहम्मद बिन सलमान यांनी दिलेल्या भेटवस्तू सुमारे 2 दशलक्ष डॉलर्सला विकल्या गेल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे. विक्री करण्यात आलेल्या भेटवस्तूंमध्ये प्रमुख्यने विशेषत: तयार केलेले घड्याळ (Watch), सोन्याचे पेन (Gold Pen), अंगठी (Ring) आणि कफलिंक (Cufflinks) आदी वस्तूंचा समावेश आहे.
पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांना सौदीचे राजे मुहम्मद बिन सलमान (Saudi Crown Prince Muhammad Bin Salman) यांनी दिलेल्या भेटवस्तू सुमारे 2 दशलक्ष डॉलर्सला विकल्या गेल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे. विक्री करण्यात आलेल्या भेटवस्तूंमध्ये प्रमुख्यने विशेषत: तयार केलेले घड्याळ (Watch), सोन्याचे पेन (Gold Pen), अंगठी (Ring) आणि कफलिंक (Cufflinks) आदी वस्तूंचा समावेश आहे. फराह शेहजादी उर्फ गोगी (Farah Shehzadi aka Gogi) नामक व्यक्तीला या सर्व वस्तू विकल्याचे वृत्त आहे. स्वत: फराह शेहजादी उर्फ गोगी यानेच हा खुलासा केल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे. SAMAA टीव्हीसोबत बोलत असताना, खरेदीदार, दुबईस्थित व्यापारी उमर फारूक (Umar Farooq) यांनी मंगळवारी खुलासा केला की तो (फराह शेहजादी उर्फ गोगी) विदेशी घड्याळांचा संग्राहक होता.
दुबईस्थित व्यापारी उमर फारूक यांनी पुढे बोलताना सांगितले की, इमरान खान यांच्या मालमत्ता पुनर्प्राप्ती युनिटचे माजी प्रमुख मिर्झा शहजाद अकबर (Mirza Shahzad Akbar) यांनी त्यांना दुर्मिळ घड्याळ खरेदी करण्यात रस आहे का? असे विचारत त्यांच्याशी संपर्क साधला होता. या प्रश्नासह संपर्क साधला होता. समोरुन स्वारस्य दाखवण्यात आल्यानंतर मिर्झा शहजाद अकबर यांच्याकडून वाटाघाटी सुरु करण्यात आल्या. (हेही वाचा, Firing at Imran Khan’s Container: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार; इम्रान यांच्यासह 4 जण जखमी)
फारुखने सांगीतले की त्याने घड्याळ आणि उर्वरित वस्तूंचा संच एका घड्याळ व्यापाऱ्याकडे मूल्यांकनासाठी नेण्यातआला. तो म्हणतो की, मी त्यांना ते कोणत्या प्रकारचे घड्याळ आहे हे प्रमाणित करण्यास सांगितले. ज्यावर मला सांगण्यात आले की हे खान-ए-काबा घड्याळाच्या चेहऱ्यासह एक प्रकारचे हिरे जडलेले ग्राफ घड्याळ आहे. हे घड्याळ म्हणजे वस्तूकलेचा एक एक 'उत्कृष्ट नमुना' आहे. बाजारभावानुसार याची किंमत पाहिली असता ती सुमारे $12 दशलक्ष ते $13 दशलक्ष आहे. जर एखाद्याला ते विकत घ्यायचे असेल तर त्यांनी त्यासाठी किती पैसे द्यावे असे विचारले असता सांगण्यात आले की जर त्याला सुमारे $5 दशलक्ष ते $7 दशलक्ष डॉलर्सचा सौदा मिळेल तर हा एक चांगला व्यवहार राहील.
दरम्यान, साम टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, प्रदीर्घ चर्चेनंतर झालेल्या त्यांच्या वाटाघाटीमध्ये, त्याने सांगितले की तो सुमारे $2 दशलक्ष डॉलर्सच्या किमतीवर ते व्यवहार पूर्ण करण्यात यशस्वी झाले. घड्याळाला किंमत कमी असण्याचे मुख्य कारण असे होते की, विक्रेत्याला रोख रक्कम हवी होती. फारुख म्हणाले की, कराराला सहमती दिल्यानंतर, त्याने त्याच्या बँकेतून 2 दशलक्ष डॉलर काढले आणि ते घड्याळ मालकाच्या प्रतिनिधींना दिले.
ट्विट
फारुखने सांगीतले की त्याने घड्याळ आणि उर्वरित वस्तूंचा संच एका घड्याळ व्यापाऱ्याकडे मूल्यांकनासाठी नेण्यातआला. तो म्हणतो की, मी त्यांना ते कोणत्या प्रकारचे घड्याळ आहे हे प्रमाणित करण्यास सांगितले. ज्यावर मला सांगण्यात आले की हे खान-ए-काबा घड्याळाच्या चेहऱ्यासह एक प्रकारचे हिरे जडलेले ग्राफ घड्याळ आहे. हे घड्याळ म्हणजे वस्तूकलेचा एक एक 'उत्कृष्ट नमुना' आहे. बाजारभावानुसार याची किंमत पाहिली असता ती सुमारे $12 दशलक्ष ते $13 दशलक्ष आहे. जर एखाद्याला ते विकत घ्यायचे असेल तर त्यांनी त्यासाठी किती पैसे द्यावे असे विचारले असता सांगण्यात आले की जर त्याला सुमारे $5 दशलक्ष ते $7 दशलक्ष डॉलर्सचा सौदा मिळेल तर हा एक चांगला व्यवहार राहील.
दरम्यान, साम टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, प्रदीर्घ चर्चेनंतर झालेल्या त्यांच्या वाटाघाटीमध्ये, त्याने सांगितले की तो सुमारे $2 दशलक्ष डॉलर्सच्या किमतीवर ते व्यवहार पूर्ण करण्यात यशस्वी झाले. घड्याळाला किंमत कमी असण्याचे मुख्य कारण असे होते की, विक्रेत्याला रोख रक्कम हवी होती. .फारुख म्हणाले की, कराराला सहमती दिल्यानंतर, त्याने त्याच्या बँकेतून 2 दशलक्ष डॉलर काढले आणि ते घड्याळ मालकाच्या प्रतिनिधींना दिले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)