Russian Court Sentences Oleg Orlov: युक्रेनसोबतच्या युद्धावर टीका, मानवाधिकार अधिवक्ता ओलेग ऑर्लोव्ह यांना रशियन कोर्टाकडून तरुंगवासाची शिक्षा

रशिया-युक्रेन युद्धावर (Russia Ukraine War) टीका केल्याने आणि या युद्धाला विरोध दर्शवल्याबद्दल मॉस्को न्यायालयाने (Moscow Court) मंगळवारी दिग्गज मानवाधिकार अधिवक्ता (Human Rights) ओलेग ऑर्लोव्ह (Oleg Orlov) यांना दोन वर्षे आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Oleg Orlov | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

रशिया-युक्रेन युद्धावर (Russia Ukraine War) टीका केल्याने आणि या युद्धाला विरोध दर्शवल्याबद्दल मॉस्को न्यायालयाने (Moscow Court) मंगळवारी दिग्गज मानवाधिकार अधिवक्ता (Human Rights) ओलेग ऑर्लोव्ह (Oleg Orlov) यांना दोन वर्षे आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना थेट ऑर्लोव्हला कोर्टरूमधूनच (Russian Court Sentences Oleg Orlov) ताब्यात घेण्यात आले. उल्लेखनीय असे की, ओलेग ऑर्लोव्ह हे सध्या 70 वर्षांचे आहेत. रशियाने युक्रेनसोबत छेडलेल्या युद्धावर त्यांनी एक लेख लिहीला होता. ज्यामध्ये रशियन सरकार आणि लष्करावर तीव्र टीका करण्यात आली होती. त्याचाच धागा पकडत सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले होते.

व्लादिमीर पुतीन यांच्या टीकाकारांसमोर आव्हान

ऑर्लोव्हचे प्रकरण राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या प्रशासनाच्या अंतर्गत युक्रेनमधील रशियाच्या कृतींवर टीका करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांसमोरील आव्हाने अधिक वाढली असल्याचे दर्शवते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे टीकाकार आणि विरोधक असलेल्या अलेक्सी नवलनी यांचा रशियातील तुरुंगात नुकताच संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर ओलेग ऑर्लोव्ह यांच्यावर झालेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. (हेही वाचा, Alexei Navalny: ॲलेक्सी नवलनी यांच्या समर्थक गटाकडून त्यांच्या मृत्यूची पुष्टी; मृतदेह अद्यापही गायब)

रशियन सरकार आणि सैन्याची बदनामी केल्याचा आरोप

ओलेग ऑर्लोव्ह यांच्यावर आपल्या लिखनातून रशियन सरकार आणि रशियन सैन्य यांची वारंवार बदनामी केल्याचा आरोप आहे. मानवाधिकार रक्षणकर्ते कार्यकर्ते आणि वकील ऑर्लोव्ह यांनी आपल्यावरील आरोपाचे खंडण केले आहे. हे आरोप पूर्णपणे राजकीयदृष्ट्या प्रेरीत आहेत. त्याला सत्याचा कोणताही आधार नाही. सरकार जाणीवपूर्वक टीकाकारांचा आणि विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी अशा प्रकारची कारवाई करत असल्याचे मत, ओलेग ऑर्लोव्ह यांनी व्यक्त केले आहे.  (हेही वाचा, Vladimir Putin यांचे टीकाकार Alexei Navalny यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर Alexander Murakhovsky बेपत्ता)

न्यायालयाने पुनर्विचार करुन ठोठवली शिक्षा

खटल्याच्या सुनावणीदरम्यान, सरकारी पक्षाने ओलेग ऑर्लोव्ह यांच्यावर कथित गुन्ह्याच्या तीव्रतेवर भर दिला. आरोपीच्या लिखानामुळे सरकार आणि लष्कर यांची प्रतिमा मलीन झाली. त्यामुळे ते शिक्षेस पात्र असल्याचे त्यांनी म्हटले. गुन्ह्याची तीव्रता पाहून न्यायालयाने दोन वर्षे आणि 11 महिन्यांच्या तुरुंगवासाची कठोर शिक्षा ठोठावली. ऑर्लोव्हला सुरुवातीला दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, सराकरी पक्षाने त्यावर आक्षेप घेत न्यायालयाला निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. त्यानंतर कोर्टाने आपणच दिलेल्या शिक्षेचा पुनर्विचार केला आणि दंडासह तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. या शिक्षेचा कालावधी 2 वर्षे 11 महिने इतका आहे. युक्रेन संघर्षाबाबत क्रेमलिनची मर्यादित सहिष्णुता दाखवून फिर्यादीने तुरुंगवासासाठी अपील करून अधिक दंडात्मक निकालाची मागणी केली. (हेही वाचा, Alexei Navalny: ॲलेक्सी नवलनी यांच्या समर्थक गटाकडून त्यांच्या मृत्यूची पुष्टी; मृतदेह अद्यापही गायब)

एक्स पोस्ट

स्वतंत्र रशियन न्यूज आउटलेट मीडियाझोनाच्या वृत्तानुसार, फिर्यादीने असा दावा केला की नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मानवाधिकार संघटनेचे सह-अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या ऑर्लोव्ह यांनी पारंपारिक रशियन नैतिक आणि आध्यात्मिक मूल्ये यांच्याबद्दल असलेला टोकाचा तिरस्कार, त्यासोबतच रशियन सैन्याशी असलेले सुप्त वैमनस्य यातूनच टीकात्मक लिखान केले आहे.