Carnivac-Cov Vaccine: रशिया मध्ये प्राण्यांना कोविड 19 पासून सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण सुरू
कोरोना विरूद्धच्या लढईमध्ये आता रशियाने (Russia) एक पाऊल पुढे टाकले आहे. आता रशियात प्राण्यांना देखील कोविड 19 ची लस देण्यात येत आहे. मार्च महिन्यातच रशियाने प्राण्यांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस रजिस्टर केल्याची माहिती दिली होती. Rosselkhoznadzor ने दिलेल्या माहितीनुसार रशियामध्ये आता विविध प्राण्यांच्या क्लिनिक्स मध्ये ही लस दिली जात आहे. कार्निवैक-कोव (Carnivak-Cov)असं व्हॅक्सिनचं नाव असून त्याच्यामुळे किमान सहा महिने प्राण्यांना रक्षण मिळणार आहे.
बीबीसी च्या रिपोर्ट्स नुसार, युरोपियन संघ, अर्जेंटीना, दक्षिण कोरिया आणि जपान द्वारा कार्निवेक कोव वॅक्सिनला पसंती मिळत आहे. दरम्यान सध्या संशोधकांचा, वैज्ञानिकांचा दावा आहे की त्यांना अद्याप कोरोनाचा प्रसार हा प्राण्यांमधून मनुष्याला होत असल्याचा कोणताही संबंध पुराव्यानिशी मिळालेला नाही. जगभरात विविध प्रजातींमध्ये कोरोना वायरस आढळला आहे. यामध्ये कुत्रे, मांजरी, वानरं, मिंक यांचा समावेश आहे.
मागील महिन्यापासूनच रशियामध्ये प्राण्यांसाठीच्या कोविड वॅक्सिनचं म्हणजेच कार्निवैक-कोव चं उत्पादन सुरू झालं आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार,रोसेलखोजनाडजोर च्या संस्थांमध्ये 17 हजार डोसेसच्या वॅक्सिन निर्मिर्तीचं उत्पादन सुरू झालं आहे. जगभरात आता या वॅक्सिन ला पसंती मिळत असल्याने अनेकांचा तिच्याकडे ओढा वाढला आहे.
रोसेलखोजनाडजोर च्या प्रमुख सल्लागाराच्या सूत्राने दिलेल्या माहितीचा एक स्थानिक रिपोर्ट सांगतो सध्या या लसीच्या उत्पादनाची क्षमता प्रति महिना अंदाजे 30 लाख डोस इतकी आहे. येत्या काही काळात ती 50 लाखांपर्यंत वाढवली जाणार आहे. आता प्राण्यांना कोविड 19 पासून सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिकेमध्येही अजून एक लस निर्मितीचं काम सुरू आहे. जोएटिस (Zoetis)कडून ती विकसित केली जात असल्याचंही सांगण्यात आले आहे.