Russia-Ukraine War: रशियाने डागली 75 क्षेपणास्त्र, विविध शहरांमध्ये असंख्य नागरिक ठार झाल्याचा युक्रेनचा दावा
दोन्ही देशांमधील शस्त्रसंघर्ष अधिकच वाढताना दिसत आहे. रशियाने (Russia) युक्रेनमधील (Ukraine) भूभागांवर नुकतीच 75 क्षेपणास्त्रं डागली. यात काही शहरांचाही समावेश आहे. युक्रेनने म्हटले आहे की, रशियाने केलेल्या हल्ल्यांमध्ये शहरांतील विविध भागांमध्ये असंख्य नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत.
रशिया युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) अद्यापही सुरुच आहे. दोन्ही देशांमधील शस्त्रसंघर्ष अधिकच वाढताना दिसत आहे. रशियाने (Russia) युक्रेनमधील (Ukraine) भूभागांवर नुकतीच 75 क्षेपणास्त्रं डागली. यात काही शहरांचाही समावेश आहे. युक्रेनने म्हटले आहे की, रशियाने केलेल्या हल्ल्यांमध्ये शहरांतील विविध भागांमध्ये असंख्य नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनची राजधानी कीव (Kyiv- Ukraine's Capital) शहराच्या मध्यवर्थी भागात सोमवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर स्फोट झाले, अशी माहिती शहराच्या महापौरांनी दिली आहे. सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणावर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये इमारतींमधून काळ्या धुराचे ढग उठताना स्पष्ट दिसत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, युक्रेनची राजधानी कीववर रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान पाच जण ठार तर १२ जण जखमी झाले. हे हल्ले प्रामुख्याने कीव शहराच्या मध्यवर्ती भागात करण्यात आले. युक्रेनियन लष्कराच्या प्रमुखांनी सांगितले की, रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीव आणि दक्षिण आणि पश्चिमेकडील शहरांवर किमान 75 क्षेपणास्त्रे डागली. (हेही वाचा, Russia-Ukraine War: रशियाकडून Nuclear Attack ची जोरदार तयारी? युक्रेनच्या फ्रंट लाईनकडे जाणाऱ्या अण्वस्त्रांच्या ताफ्याचा व्हिडीओ व्हायरल (Watch))
ट्विट
युक्रेनचे जनरल व्हॅलेरी झालुझनी यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, "दहशतवादी देश रशियाने युक्रेनच्या भूभागावर प्रचंड क्षेपणास्त्रे आणि हवाई हल्ले केले आहेत, तसेच ड्रोनचाही वापर केला आहे. सकाळी, आक्रमकाने 75 क्षेपणास्त्रे डागली. त्यापैकी 41 आमच्या हवाई संरक्षणाने पाडली''.
ट्विट
ट्विट
कीवमध्ये काही महिने सापेक्ष शांतता राहिल्यानंतर स्थानिक वेळेनुसार 08.15 च्या सुमारास हे स्फोट झाले आणि स्फोटांच्या एक तासापूर्वी युक्रेनच्या राजधानीत हवाई हल्ल्याचे सायरन वाजले.