Russia Birth Rate Fall: रशियामध्ये गेल्या दहा वर्षातील सर्वात कमी जन्मदराची नोंद; जूनमध्ये जन्मदर 6 टक्यांनी घटला

दुसरीकडे युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धाचाही घटत्या जन्मदरावर परिणाम झाला असल्याचे सांगितले जात आहे,

Photo Credit- X

Russia Birth Rate Fall: सांख्यिकी सेवा Rosstat द्वारे नुकत्याच प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार, 2024 च्या पहिल्या सहामाहीत रशियामध्ये 599,600 मुलांचा जन्म(Russia Birth Rate) झाला. जो 2023 च्या याच कालावधीच्या तुलनेत तब्बल 16,000 कमी (Birth Rate Decrease)आहे. विशेष म्हणजे 1999 नंतर ही आकडेवरी सर्वात कमी आहे. जूनमध्ये, नवजात मुलांची संख्या 6% घसरून 98,600 वर आली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच रशियातील जन्मदराची आाकडेवारी पहिल्यांदाच 100,000 च्या खाली गेली आहे. असे रशियन मीडियाने म्हटले आहे. (हेही वाचा: South Korea: दक्षिण कोरियाचा जन्मदर जगात सर्वात कमी, उपाययोजना म्हणून सरकार लग्नासाठी देणार 38 हजार डॉलर)

जानेवारी ते जून या कालावधीत 325,100 मृत्यू किंवा गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 49,000 अधिक मृत्यूसह रशियाच्या लोकसंख्येच्या नैसर्गिक घटली होती. या वर्षी मृत्यूंच्या आकडेवारीत वाढ नोंदवल गेली आहे. जानेवारी-जूनमध्ये स्थलांतरीतांची आकडेवारी 20.1 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे देखील लोकसंख्येवर परिणाम झाला. परिणामी लोकसंख्या काही प्रमाणात घटली होती, असे डेटा दर्शवितो. (Japan : जन्मदर वाढवण्यासाठी टोकियो प्रशासन डेटिंग ॲप लॉन्च करण्याच्या तयारीत; नेमकं प्रकरण काय? घ्या जाणून)

'हे राष्ट्राच्या भविष्यासाठी आपत्तीजनक आहे,' क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी जुलैमध्ये म्हटले आहे. रशियाच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह ड्यूमा येथील कुटुंबांच्या संरक्षणासाठीच्या समितीच्या प्रमुख नीना ओस्टानिना यांनी राज्य आरआयए वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, जन्मदर सुधारण्यासाठी 'विशेष लोकसंख्याशास्त्रीय ऑपरेशन' आवश्यक आहे.

जपानमध्ये जन्मदर वाढवण्यासाठी टोकियो प्रशासनाने डेटींग ॲप लॉन्च केले आहे. देशाच्या घटत्या लोकसंख्येला तोंड देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. ज्यावर तरुण-तरुणी एकमेकांना भेटतील . त्यातून त्यांचे नाते निर्माण झाल्यास लोकसंख्येचा प्रश्न मिटू शकतो.