IPL Auction 2025 Live

COVID-19 Vaccine Update: 60 वर्षांवरील नागरिकांवर Sputnik V लसीचा वापर करण्यास रशियाची मंजूरी

रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

Sputnik V Vaccine (Photo Credits: File Image)

रशियाने (Russia) कोविड-19 लस (Covid-19 Vaccine) Sputnik V चा वापर 60 वर्षांवरील व्यक्तींवर करण्यासाठी परवानगी दिली आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी रशियात सुरु असलेल्या लसीकरण कार्यक्रमातून (National Inoculation Programme) मधून 60 वर्षांवरील व्यक्तींना दूर ठेवण्यात आले होते. (COVID 19 Vaccine in India Updates: रशियामध्ये भारतीय बनवटीचे Sputnik V चे सॅम्पल टेस्ट साठी सज्ज; देशात 2021 पर्यंत तयार होणार 300 मिलियन डोस)

Sputnik V लसीच्या वेगळ्या चाचण्या 60 वर्षांवरील व्यक्तींवर करण्यात आल्या. ही लस कोविड-19 पासून दोन वर्षांपर्यंत सुरक्षा देते, असा दावा गमलेया एपिडिमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीचे राष्ट्रीय संशोधन केंद्रातील (Gamaleya National Research Center for Epidemiology and Microbiology) लस निर्मितीच्या प्रमुख Alexander Gintsburg यांनी केला आहे.

रशियाने Sputnik V लसीचे रजिस्ट्रेशन 11 ऑगस्ट रोजी केले होते आणि त्यामुळे कोरोना व्हायरस वरील ही जगातील पहिली लस ठरली. ही लस गमलेया एपिडिमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीचे राष्ट्रीय संशोधन केंद्राने विकसित केली असून याच्या सुरुवातीच्या ट्रायल्स 7 सप्टेंबर रोजी मॉस्को मध्ये सुरु झाल्या होत्या. 9 सप्टेंबर रोजी स्वयंसेवकांना या लसीचा पहिला डोस देण्यात आला.

2 डिसेंबरपासून रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी देशभरात लसीकरण सुरु करण्याचे आदेश दिले, दरम्यान, ट्रायल्स मधून हाती आलेल्या अहवालानुसार, Sputnik V ही लस पहिला डोस दिल्याच्या 42 दिवसानंतर तब्बल 95 टक्क्यांपेक्षा अधिक परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. परंतु, यासाठी त्या व्यक्तीने लसीचा दुसरा डोस घेणे देखील गरजेचे आहे. (COVID-19 Vaccine Update: युके च्या अ‍ॅस्ट्रॅजेनेका-ऑक्सफर्ड लसीचे रशियाच्या Sputnik V लसीसोबत एकत्रित ट्रायल्स; 2020 अखेरपासून सुरु होणार चाचण्या)

गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना संकटाने संपूर्ण जग त्रस्त झाले आहे. त्यामुळे कोविड-19 वरील लसीची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. मात्र ब्रिटेनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळून आल्याने पुन्हा एकदा जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, सर्वच देश कोविड-19 च्या नव्या स्ट्रेनचा धोका टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेत आहेत.