बँक खात्यात अचानक अब्ज रुपयांची कमाई, रिक्षाचालकाला आली भोवळ

रिक्षाचालकाच्या बँक खात्यात अचानक 3 अब्ज रुपये आल्याने त्याला भोवळ आली आहे.

ऑटो रिक्षा (फोटो सौजन्य- PTI)

पाकिस्तानमध्ये एका रिक्षाचालकाला आपल्या मुलीला सायकल विकत घेण्यासाठी खूप कष्ट करुन 300 रुपये बँकेच्या खात्यात जमवले. मात्र रिक्षाचालक ही रक्कम काढण्यास बँकमध्ये गेला तेव्हा त्याच्या खात्यात 3 अब्ज रुपये असल्याचे कळल्याने त्याला भोवळ आली. तर अचानक ऐवढे अब्ज रुपये आपल्या खात्यात कसे आले याबद्दल त्याला मोठा प्रश्न पडला आहे.

पाकिस्तानमध्ये मनीलॉंड्रींग विरोधात या देशाचे पंतप्रधान यांनी कडक नियम लागू केले होते. त्यावेळी मोहम्मद रशीद खान या रिक्षाचालकाला पंतप्रधानांनी लागू केलेल्या या नियमाची आठवण झाली. यानंतर मोहम्मदला फेडरल तापस यंत्रणेकडून फोन येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर मोहम्मदला तपास यंत्रणेच्या कंपनीला आपल्या खात्यातील रक्कमेबद्दल लपवाछपवी करु लागला. मात्र घरातील मंडळी आणि मित्रमंडळींकडून त्याला या प्रकरणाबद्दल समजुत घालण्यात आली.

या घटनेने मोहम्मदच्या तोंडचे पाणी पळाले असून त्याने रिक्षा चालवणेच सोडून दिले आहे. तर या घटनेची माहिती तिला कळताच ती आजारी पडली आहे असे मोहम्मदने सांगितले. तसेच या प्रकरणात त्याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. मात्र पाकिस्तानची सध्याच्या अर्थव्यवस्थेवर नजर टाकल्यास त्यांचा फार वाईट काळ सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मनीलॉंड्रीमार्फत देशाच्या बाहेर जाणारा पैसा परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.