US Presidential Elections 2020: रिपब्लिकन पक्षाकडून Donald Trump व Mike Pence यांना अधिकृत उमेदवारी जाहीर
यंदाच्या 3 नोव्हेंबरला या निवडणुका होणार आहेत,
रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये सोमवारी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी (US Presidential Elections 2020) डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना औपचारिकरित्या उमेदवार जाहीर करण्यात आले. यंदाच्या 3 नोव्हेंबरला या निवडणुका होणार आहेत, त्या साठी रिपब्लिकन पक्षाने (Republican Party) डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या माजी उपराष्ट्रपती जो बिडेन (Joe Biden) यांच्यासमोर उभे केले आहे. ट्रम्प यांच्या सोबतच उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून माईक पेंस (Mike Pence) यांची निवड झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प व्हाईट हाऊसच्या साऊथ लॉनकडून 27 ऑगस्ट रोजी स्वीकृती भाषण देऊ शकतात. पेन्स बुधवारी आपले स्वीकृती भाषण देतील.
सर्व 50 राज्यांतील निवडून आलेल्या जीओपी प्रतिनिधींच्या रोल कॉलनंतर अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष, 74 वर्षीय ट्रम्प यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. नामांकन मिळाल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, त्यांचे प्रशासन व्हायरस नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी ठरले आहे. तसेच त्यांनी राज्यांच्या राज्यपालांना फटकारले, ते म्हणाले की हे लोक व्हायरसशी लढण्यात कुचकामी ठरले.
एएनआय ट्वीट -
स्वतःच्या आणि ट्रम्प यांच्या उमेदवारीनंतर पेन्स म्हणाले, 'आम्ही या आठवड्यात अमेरिकेच्या लोकांपर्यंत आमच्या गोष्टी घेऊन जाणार आहोत. हे (सरकार) आणखी चार वर्षे चालणार आहे व आम्ही पुन्हा अमेरिकेला महान बनवू.' कोरोना विषाणूचा साथीचा रोग असूनही, प्रतिनिधी सोमवारी (24 ऑगस्ट) शार्लोट कन्व्हेन्शन सेंटरच्या बॉलरूममध्ये एक होय किंवा नाही या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी हजर झाले होते. (हेही वाचा: राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीत Joe Biden डेमोक्रेटिक पक्षाचे अधिकृत उमेदवार)
याउलट, डेमॉक्रॅटिक पक्षाने बिडेन यांच्या दाव्यासाठी राज्यांचे व्हिडीओ मॉन्टेज चालवून हो किंवा नाहीचा आधार घेतला. यामुळे मोठ्या संख्येने लोकांचे एकत्र येणे टाळले गेले. रिपब्लिकन पक्षाची परिषद ही ट्रम्प यांच्यासाठी महत्वाची संधी आहे, कारण ते राष्ट्रीय आणि महत्त्वाच्या राज्यांत मागे पडताना दिसत आहेत.