Rare Tow Headed Snake Spotted in US Zoo:यूएसमधील प्राणिसंग्रहालयात आढळला दुर्मिळ दोन डोक्याचा साप,व्हिडिओ होतोय व्हायरल
ज्याचा उद्देश या प्राण्यांची भव्यता आणि अनेकदा आपण प्राण्यां बधल करून घेतलेल्या गैरसमजा वर प्रकाश पाडणे आहे.
Tow Headed Snake :दोन डोकी असलेल्या दुर्मिळ सापाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ ज ब्रेवेर नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्यक्ती यूएसमधील एका प्राणीसंग्रहालयात कर्मचारी असून तो सरपटणाऱ्या प्राण्यांचे चित्र-विचित्र व्हिडिओ शेअर करण्यासाठी ओळखला जातो. आताही त्याने ज्या सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे त्याला एकाच बाजूला दोन तोंडं असल्याचे पाहायला मिळते. व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार सापाची ही प्रजात फारशी प्रचलीत नाही. त्यामुळे काही नैसर्गिक घटनांमुळे अशा पद्धतीचे साप जन्माला येतात मात्र ते सृष्टीशी अधिक काळ जमवून घेऊ शकत नाहीत. परिणामी त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे दोन डोके असलेला साप हा खूप दुर्मिळ मानला जात असला तरी त्याची जगण्याची शक्यता फार कमी आहे. असे असले तरी, जय ब्रेवेर याने या सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करुन नेटीझन्सचे लक्ष घेचून घेतले आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, हा साप ब्रेवर यास दंश करण्याचा प्रयत्न करत आहे.हेही वाचा: Snake Viral Video: दाराच्या उंबर्यात साप पाहून हडबडलेल्या चिमुकल्याल्या वाचवलं आईच्या सतर्कतेने (Watch Video)
दरम्यान, जय ब्रेवेर याने हा व्हिडिओ शेअर करताना सोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, दोन डोक्यांच्या या दुर्मिळ सापाने मला दंश केला. सुरुवातीला मला वाटले एका चिडलेल्या सापाचा सामना करणे माझ्यासाठी पुरेसे असेल पण आता मला एकाच वेळी दोन सापांचा सामा करावा लागेल. दोघांपैकी एक नक्कीच भयंकर आहे पण आता त्यातील दोघांनीही मला दंश करण्याचे ठरवले असल्याचे मला वाटते आहे.