Quad Summit 2021: क्वाड परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडन यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा

या भेटीदरम्यान उभय नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

Prime Minister Narendra Modi and US President Joe Biden | | (Photo Credit: ANI / Twitter)

क्वाड (Quad Summit 2021) देशांच्या एका संयुक्त परिषदेसाठी (Quad Meet) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन (US President Joe Biden) यांच्यात भेट झाली. या भेटीदरम्यान उभय नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा केली. ज्यात कोविड ते हवामान बदल आणि दोन्ही देशांनी विविध पातळ्यांवर एकमेकांना सहकार्य करण्यापर्यंतच्या मुद्द्यांचा समावेश आहे. ही बैठक अमेरिकेचे सत्ताकेंद्र असलेल्या व्हाईट हाऊस येथे पार पडत आहे. इंडो-पॅसिफिक, कोविड-19, यांसह इतरही मुद्द्यांवर चर्चा होईल, असे बायडन यांनी या आधीच स्पष्ट केले आहे. याशिवाय अफगानिस्तान (Afghanistan) मध्ये पाकिस्तानची भूमिका (Pakistan's Role) यावरही या भेटीत चर्चा होईल.

क्वाड परिषदेतील पंतप्रधान मोदी आणि बायडेन यांच्या भेटीबाबत माहिती देताना विदेश मंत्रालयाने म्हटले आहे की, द्विपक्षीय चर्चेत आणि क्वाड शिखर परिषदेत अफगानिस्तान आणि अफगानिस्तानमध्ये असेलेली पाकिस्तानची भूमिका आणि दहशतवाद यावर मोठी चर्चा झाली. क्वाड आणि इतर सहभागी देशांनी या विषयाच्या अनेक महत्त्वांच्या पैलूंवर लक्ष वेधले. जे कधी कधी दूर्लक्षीत राहतात. (हेही वाचा, PM Narendra Modi- Kamala Harris Meet: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कमला हॅरिस यांना भारतात येण्यासाठी आमंत्रण, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा)

ट्विट

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, त्यांनी पहिल्या क्वाड नेत्यांसोबतच्या व्यक्तीगत बैठकीदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांच्यासोबत व्यापर आणि सहकार्य या मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांच्यासोबत मेजवानीमध्ये व्हाईट हाऊसमध्ये जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या नेत्यांसोबत क्वाड लीडर्स परिषदेत भाग घेताल. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, व्यापाराच्या क्षेत्रात बरेच काही करायचे आहे. येणारे दशत भारत-अमेरिका संबंधांमध्ये व्यापार हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. स्पर्धेत पुढे जाण्याची ताकद असते. आम्ही व्यापक वैश्विक भलाईच्या मुद्द्यावर स्पर्धेचा लाभ उठवू इच्छितो. त्यासाठी आपल्याला आपली सर्व प्रथिभा वापरायला हवी.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif