धक्कादायक! पंतप्रधान Ersan Saner यांचा Solo Sex Act व्हिडिओ झाला व्हायरल; द्यावा लागला राजीनामा
तुर्की माफियांवर आरोप करत इरसान सानेर म्हणाले की, हा केवळ माझ्यावरच नाही तर माझ्या कुटुंबावर, माझ्या पक्षावर आणि आमच्या राजकीय संस्थांवर हल्ला आहे, म्हणून आम्ही आमच्या कायदेशीर सल्लागारांसोबत बैठक घेत आहोत
उत्तर सायप्रसचे (Northern Cyprus) पंतप्रधान इरसान सानेर (PM Ersan Saner) यांच्या एका व्हिडिओमुळे देशात खळबळ माजली आहे. या व्हिडिओमध्ये ते चक्क सेक्स अॅक्ट (Sex Act) करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पंतप्रधान सानेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सानेर यांनी आरोप केला आहे की, हा व्हिडिओ मुद्दाम त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे आणि माफियांच्या सांगण्यावरून तो लीक झाला आहे. माध्यमांच्या अहवालात असे म्हटले आहे की, इरसान सानेर यांनी ऑनलाईन एका महिलेला कपड्यांशिवाय पाहिले आणि त्यानंतर त्यांनी हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इरसान सानेर असेही म्हणतात की, या व्हिडिओमध्ये दाखवलेली व्यक्ती दुसरीच कोणी आहे. इरसान हे 54 वर्षांचे असून त्यांचे लग्न झाले आहे व त्यांना दोन मुले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते राजकीय दबावाला बळी पडत आले आहेत. त्यांचा स्वतःचा पक्ष राष्ट्रीय एकता पक्षाने (UBP) सरकारला पाठिंबा काढून घेतला, मात्र, तरीही ते सरकारमध्ये राहिले. लवकर निवडणुकीनंतर ते राजकारणात राहण्याचा विचार करत होते, परंतु हा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये, 20 वर्षीय मुलगी स्ट्रिपटीज करताना दिसत आहे तर पंतप्रधान इरसान सानेर कथितपणे हस्तमैथुन करत आहेत. मात्र, सानेर हा व्हिडिओ बनावट असल्याचे सांगत आहेत. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की हा व्हिडिओ माझा नाही. कोणीतरी मला माझ्या प्रिय देशाची, माझ्या पक्षाची सेवा करण्यापासून रोखू इच्छित आहे. परंतु ते सर्व राजकीय मार्गांनी नव्हे तर वैयक्तिक हल्ल्यांद्वारे घडत आहे, हे एक षडयंत्र आहे. (हेही वाचा: Penis Stuck in Tube: लिंगाची लांबी मोजणे पडले महागात, ट्यूबमध्ये अडकला प्रायव्हेट पार्ट; करावे लागली शस्त्रक्रिया)
तुर्की माफियांवर आरोप करत इरसान सानेर म्हणाले की, हा केवळ माझ्यावरच नाही तर माझ्या कुटुंबावर, माझ्या पक्षावर आणि आमच्या राजकीय संस्थांवर हल्ला आहे, म्हणून आम्ही आमच्या कायदेशीर सल्लागारांसोबत बैठक घेत आहोत. मंगळवारी एका तुर्की पत्रकाराने हा व्हिडिओ प्रथम ट्विटरवर पोस्ट केला होता. त्यानंतर तो व्हायरल झाला. व्हिडिओ समोर येताच पंतप्रधानांवर टीका व्हायला सुरुवात झाली व अखेर त्यांनी राजीनामा दिला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)