Porn Videos: चर्चचे नन्स आणि पादरीदेखील इंटरनेटवर पाहतात अश्लील व्हिडिओ; ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च नेते Pope Francis यांची कबुली
विशेष म्हणजे नन आणि धर्मगुरूंना पॉर्नपासून दूर राहण्याचा सल्ला देणारे पोप फ्रान्सिस यांना नोव्हेंबर 2020 मध्ये बिकिनी मॉडेल नतालिया गॅरीबोटोचे सेक्सी फोटो लाईक केले होते.
ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च नेते पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांनी कबुली दिली आहे की चर्चमधील नन्स आणि धर्मगुरूही पॉर्न (Porn Videos) पाहतात. पोप फ्रान्सिस यांनी धर्मगुरू आणि नन्स यांना पॉर्न पाहू नका, असे निर्देश दिले आहेत. या व्यसनामुळे हृदय कमकुवत होते, असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या उपदेशादरम्यान, पोप मान्य केले की अनेक नन्स ऑनलाइन पॉर्न पाहतात. पोप फ्रान्सिसच्या मते, जेव्हा तुम्ही पॉर्न पाहता तेव्हा तुमच्यामध्ये सैतान घुसतो.
व्हॅटिकन सिटीमध्ये सोमवारी (24 ऑक्टोबर 2022) एका चर्चासत्रात पोप यांनी या गोष्टी सांगितल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 85 वर्षीय पोप यांनी ऑनलाइन पोर्नोग्राफी हा ‘धोका’ असल्याचे सांगितले. हा दोष (पॉर्नचे व्यसन) पाद्री आणि नन्समध्येही आला आहे, असे पोप म्हणाले. या चर्चासत्रात पोप म्हणाले की, जे अश्लील गोष्टी पाहतात ते येशूला प्राप्त करू शकणार नाहीत. (हेही वाचा: Mass Grave: डिपार्टमेंट स्टोअरच्या खाली सापडले 300 सांगाडे; निम्मे अवशेष लहान मुलांचे, परिसरात खळबळ)
पॉर्न पाहणाऱ्यांमध्ये सैतानचा शिरकाव होत असल्याची माहिती देताना पोप म्हणाले की, जर तुम्ही अशा गोष्टी पाहत असाल तर त्या लगेच मोबाईलमधून काढून टाका. ही गोष्ट चर्चच्या शिकवणीच्या विरुद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. पोप म्हणाले की, चर्चच्या तत्त्वांनुसार पॉर्न पाहणे हा पवित्रतेच्या विरोधात गुन्हा आहे, त्यामुळे त्याचा मोह करू नका. एका चर्चच्या विद्यार्थ्याने पोप यांना विचारले की धर्मगुरूंनी फोनसारख्या आधुनिक जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करावा का? यावर पोप फ्रान्सिस म्हणाले की, तुम्ही त्यांचा वापर करा पण फक्त मदत मिळवण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी.
व्हॅटिकन सिटीने बुधवारी (26 ऑक्टोबर) पोपच्या या सूचना प्रकाशित केल्या. विशेष म्हणजे नन आणि धर्मगुरूंना पॉर्नपासून दूर राहण्याचा सल्ला देणारे पोप फ्रान्सिस यांना नोव्हेंबर 2020 मध्ये बिकिनी मॉडेल नतालिया गॅरीबोटोचे सेक्सी फोटो लाईक केले होते. पोपच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हे लाईक करण्यात आले आहे. त्यानंतर ही बातमी खूप चर्चेचा विषय ठरली होती.