OMG! 137 रुपयांच्या दह्यासाठी 6 आरोपींची DNA टेस्ट; पोलिसांकडून 'चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला'
प्राप्त माहितीनुसार, दह्याची किंमत केवळ 137 रुपये ($1.92) इतकी होती. ही बातमी वाचल्यावर कोणाला चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला ही म्हण आठवल्यास कोणाला आश्चर्य वाटायला नको.
कानून के हात लंबे होते हैं...!, असे म्हणत पोलीसांनी एखादी गोष्ट जर एकदा का मनावर घेतली तर, ते त्याच्या मुळापर्यंतच जातात. मग तो गुन्हा मोठा असो की छोटा. त्याचा तपास ते करणारच. ही बातमी आहे तैवान पोलिसांबाबतची. एका विद्यार्थिनीने आपल्या फ्रिजमधील दही चोरल्याची पोलिसांत तक्रार केली. आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा तर नोंदवून घेतलाच. पण, गुन्हेगाराला पकडण्यासाठी त्यांनी संशयीत आरोपींची फिंगर प्रिंट घेतली आणि थेट DNA टेस्टही करण्याबाबतही पावले टाकली. दरम्यान, पोलिसांची ही तपासपद्धत स्थानिक लोकांना फारशी ठिक वाटली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांवर टीका केली.
तक्रारदार विद्यार्थिनीने दही चोरल्याची तक्रार केल्यानंतर हे प्रकरण सुरु झाले. विद्यार्थिनीची तक्रार होती की, कोणीतरी तिच्या फ्रिजमधील दही चोरुन खाल्ले आहे. तिने तिच्यासोबत राहणाऱ्या ५ इतर विद्यार्थिनींकडे विचारणा केली. मात्र, कोणीच कबूली दिली नाही. अखेर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. मग पोलिसांनी तपास सुरु केला. दरम्यान, एका क्षुल्लक गुन्ह्याच्या तपासासाठी इतकी महागडी पद्धत वापरल्या बद्दल पोलिसांवर टीका होत आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एक विद्यार्थिनी दह्याचे पाकीट घेऊन पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेली. पोलीसांनीही किरकोळ गुन्हा म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी थेट चोरीचा गुन्हा दाखल करुन घेतला. चोराला पकडण्यासाठी पोलिसांनी फिंगरप्रिंट घेण्याचाही प्रयत्न केला. पण, फिंगरप्रिंट मिळू शकले नाहीत. त्यामुळे संबंधित विद्यार्थीनीने वैज्ञानिक पद्धतीने तपास करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी ६ संशयीत आरोपींची DNA टेस्ट केली आणि चोराला पकडले. (हेही वाचा, McDonald's मधून तरुणीला Extra Tomato Ketchup नाही दिला म्हणून मॅनेजरला मारहाण)
DNA टेस्ट ही बरीच खर्चिक असते. त्यामुळे दही चोरीच्या किरकोळ गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीसांनी ६ लोकांची DNA टेस्ट करावी हे तसे विशेषच. ६ लोकांची DNA टेस्ट करण्यासाठी तब्बल ४२ हजारांहूनही अधिक खर्च झाला. तर, स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्य वृत्तानुसार दह्याची किंमत केवळ 137 रुपये ($1.92) इतकी होती. ही बातमी वाचल्यावर कोणाला चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला ही म्हण आठवल्यास कोणाला आश्चर्य वाटायला नको.