G-20 Summit : 2022 साली भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी वर्षी भारत भूषवणार G-20 Summit चं यजमानपद

2022सालाच G-20 Summit भारतामध्ये आयोजित होईल.

G 20 Summit (Photo credit : Twitter )

G-20 Summit मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिन वर्षी G-20 Summit चं आयोजन आणि यजमानपद भूषणवण्याचा मान भारताला मिळाला आहे. 2022  सालाच G-20 Summit भारतामध्ये आयोजित होईल. त्यामुळे भारताला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या वर्षी G-20 Summit भारतामध्ये होणं हे इतर राष्ट्रांकडून भारताला मिळालेलं एक गिफ्ट असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

ट्विटरच्या माध्यमातून माहिती देताना नरेंद्र मोदी म्हणाले, ' भारत ही झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. 2022 साली भारत स्वातंत्र्याची 75  वर्ष पूर्ण करत आहे. भारतासाठी खास असणाऱ्या या वर्षांत जगाला G-20 Summit साठी आमंत्रित करताना आनंद होत आहे. भारतामध्ये या, भारताची संस्कृती, इतिहास, विविधता आणि आदरातिथ्य काय असतं ते पहा असं नरेंद मोदींनी म्हटलं आहे.

सध्या अर्जेटिनाची राजधानीमध्ये G-20 Summit मध्ये सहभागी होण्यासाठी नरेंद्र मोदी ब्यूनस आयर्समध्ये आहेत. दोन दिवसीय G-20 Summit च्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी G-20 Summit च्या नेत्यांना 2022 साली भारतामध्ये येण्याचं आमंत्रण दिली आहे. यावेळेस इटलीचे त्यांनी विशेष आभार मानले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif