फिलिपिन्स कडून भारतासह 9 अन्य देशांच्या प्रवासावरील हटवली बंदी

मात्र आता हिच बंदी 6 सप्टेंबर पासून हटवली जाणार आहे.

Flight | Representational Image (Photo Credits: Pixabay)

फिलिपिन्स (Philippines) कडून वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे भारतासह अन्य 9 देशांच्या प्रवासावर बंदी घातली होती. मात्र आता हिच बंदी 6 सप्टेंबर पासून हटवली जाणार आहे. राष्ट्रपती यांचे प्रवक्ते हॅरी रोके यांनी असे म्हटले की, फिलिपिन्स भारतासह अन्य 9 देशांच्या प्रवासावरील बंदी हटवणार आहे. परंतु डेल्टा वेरियंटच्या प्रकरणांमध्ये अधिक घट झालेली नाही.(Mu Variant: समोर ला Covid-19 चा अजून एक धोकादायक व्हेरिएंट 'म्यू'; 40 हून अधिक देशांमध्ये नोंदवली चार हजार प्रकरणे- WHO)

फिलिपिन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुर्तेते यांनी भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ, संयुक्त अरब अमीरात, ओमान, थायलं, मलेशिया आणि इंडोनेशिया मध्ये प्रवासावरील बंदी हटवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. रोके यांनी असे म्हटले की, या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना मात्र चाचणी आणि क्वारंटाइनच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

दरम्यान, राजकीय व्यक्ती आणि नागरिकांना खासकरुन विशेष वीजा धारक वगळता अन्य आंतरराष्ट्रीय पर्यटकांना देशात प्रवेशासाठी अद्याप निर्बंध लागू असणार आहेत. डेल्टा वेरियंटचा प्रादुर्भाव फिलिपिन्समध्ये झाला आहे. देशात 33 मृत्य आणि 1789 डेल्टा प्रकरणे समोर आली आहेत. डब्लूएचओने डेल्टा वेरियंटच्या सामुदायिक प्रादुर्भावाची पुष्टी करत असे म्हटले की, आता कोरोना व्हायरसचा फिलिपिन्समध्ये प्रादुर्भाव वाढला आहे.(South Africa मध्ये सापडला Covid-19 चा आतापर्यंतचा सर्वात संसर्गजन्य व्हेरिएंट C.1.2; कोरोना लसीवरही देऊ शकेल मात)

एप्रिल मध्ये फिलिपिन्स ने भारतावर निर्बंध लावले होते. त्यानंतर डेल्टाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर यामध्ये आणखी काही देशांचा समावेश करण्यात आला. फिलिपिन्समध्ये कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत आहे.