Philippines Plane Crash Update: फिलीपिन्स विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत 29 जवानांनी गमावले प्राण

यातील काही जवानांची प्रकृती चिंताजनक आहे.

Philippines Plane Crash (Photo Creduts: Twitter)

फिलिपिन्समध्ये (Philippines) लष्करी विमान सी-130 सुलुतील जोलो बेटावर लँडिग करत असताना मोठी दुर्घटना (Plane Crash) घडली आहे. या दुर्घटनेत 29 जवानांनी आपले प्राण गमावले असून 50 जणांना वाचवण्यात यश आले आहे. यातील काही जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. महत्वाचे म्हणजे, अजूनही काही जवान विमानाच्या ढिगाऱ्याखाली असल्याचे बोलले जात आहे. ज्यामुळे या घटनेतील मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनाग्रस्त विमानातून जवानांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

फिलिपिन्समधील दक्षिण कागायान डी ओरो शहरातून लष्करी विमान जवानांना घेऊन जात होते. त्यावेळी विमान सुलुतील जोलो बेटावर उतरत असताना धावपट्टीवरचा वैमानिकाचा अंदाज चुकाला. ज्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले. या विमानात एकूण 92 जवान होते. हे देखील वाचा- South Africa: महिलांना एकापेक्षा जास्त पुरुषांशी लग्न करण्यास परवानगीचा प्रस्ताव; सरकारच्या निर्णयाविरुद्ध निर्माण झाला वाद

एएफपीच्या म्हणण्यानुसार, विमानातील बहुतांश सैनिकांनी मूलभूत प्रशिक्षण घेतले होते. या सैनिकांना दहशतवादी कारवायांसाठी प्रसिद्ध असलेल्या मुस्लिम-बहुल आयलँडवर तैनात करण्यासाठी घेऊन जात होते. फिलिपिन्सच्या या बेटांवर अपहरणाच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे या परिसरात नागरिकांचे रक्षण करण्यासाठी मोठ्या संख्येत सैनिक तैनात असतात. या ठिकाणी अबु सैय्यफ नावाची दहशतवादी संघटना कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif